शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 10:19 IST

आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये ५.३५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ११ झाली आहे.

ईशान्येकडील भागात पुरामुळे लाखो लोक अडचणीत आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये ५.५ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. ईशान्येकडील भागात पूर आणि भूस्खलनामुळे आसाममध्ये सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेशात १०, मेघालयात सहा, मिझोराममध्ये पाच, सिक्कीममध्ये तीन आणि त्रिपुरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये ५.३५ लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, तर एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या ११ झाली आहे. रिपोर्टनुसार, १५ नद्यांना पूर आला आहे. सिक्कीममधील छातेन येथील लष्करी छावणीत झालेल्या भूस्खलनामुळे तीन जवानांचा मृत्यू झाला आहे आणि सहा जवान बेपत्ता आहेत, असं संरक्षण अधिकाऱ्याने सांगितलं.

हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान

मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट 

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी सर्वात जास्त नुकसान झालेल्या लखीमपूर जिल्ह्याला भेट दिली आणि बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये बहुतेक ठिकाणी सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुरामुळे लाखो लोकांना फटका

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, २२ जिल्ह्यांतील  ६५ महसूल क्षेत्र आणि १२५४ गावांमधील ५१५०३९ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. सर्वात जास्त प्रभावित जिल्हा श्रीभूमी आहे, जिथे १९४१७२ लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, त्यानंतर कछार जिल्ह्यात ७७९६१ लोक आणि नागावमध्ये ६७८८० लोक आहेत.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssam Floodआसाम पूरAssamआसामsikkimसिक्किमTripuraत्रिपुरा