ईशान्यपूर्व राज्यांकरिता स्वतंत्र टाईम झोनची योजना नाही

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:34+5:302014-12-18T22:39:34+5:30

नवी दिल्ली-ईशान्यपूर्वेकडील सात राज्यंाकरिता स्वतंत्र टाईम झोन बनविण्याची कुठलीही योजना नसल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले आहे. ईशान्यपूर्व भागाचे विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ही माहिती राज्यसभेला दिली. या भागात टाईम झोन नसल्याने येथील घरे व कार्यालयांमध्ये विजेची नासाडी होत असल्याच्या वृत्ताचाही इन्कार केला.

North-East states do not have a free time zone plan | ईशान्यपूर्व राज्यांकरिता स्वतंत्र टाईम झोनची योजना नाही

ईशान्यपूर्व राज्यांकरिता स्वतंत्र टाईम झोनची योजना नाही

ी दिल्ली-ईशान्यपूर्वेकडील सात राज्यंाकरिता स्वतंत्र टाईम झोन बनविण्याची कुठलीही योजना नसल्याचे सरकारने गुरुवारी स्पष्ट केले आहे. ईशान्यपूर्व भागाचे विकास राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ही माहिती राज्यसभेला दिली. या भागात टाईम झोन नसल्याने येथील घरे व कार्यालयांमध्ये विजेची नासाडी होत असल्याच्या वृत्ताचाही इन्कार केला.
बेंगळुरूच्या नॅशनल इन्स्टट्यिूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीजने अनेक गृहितकांच्या आधारे केलेल्या संशोधनात ईशान्यपूर्व राज्यात विजेच्या एकूण वापरात केवळ १.२ ते १.५ टक्के विजेची बचत करण्यात आली असल्याचे नोंदविले आहे.
१९९० च्या दशकात ईशान्यपूर्व राज्यांकरिता टाईम झोनची मागणी करण्यात आली होती. कारण येथे सूर्योदय पहाटे ४ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजण्याच्या दरम्यान होत असतो जो सामान्य सूर्योदयाच्या वेळेपेक्षा एक तास आधी होतो असे कारण देण्यात आले होते.

Web Title: North-East states do not have a free time zone plan