शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

बिगर आदिवासी टाकणार निवडणुकीवर बहिष्कार?

By admin | Updated: September 27, 2014 00:17 IST

पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाला १०० टक्के आरक्षण जाहीर केल्याने या जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाज प्रचंड संतप्त झाले आहेत.

वाडा : पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाला १०० टक्के आरक्षण जाहीर केल्याने या जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाज प्रचंड संतप्त झाले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून सरकारचे लक्ष वेधावे असा उमटत असून काही गावांनी तर आपल्या प्रवेशद्वाराजवळ बहिष्काराचे फलक लावून त्याची सुरूवात केली आहे. यामुळे पक्षांच्या इच्छुक उमेदवारांचे मात्र धाबे दणाणले आहेत.पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजाला नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण दिल्याचा वटहुकूम ९ जून रोजी तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायण यांनी काढला. त्याची अंमलबजावणी विद्यमान राज्यपाल विद्यासागर राव करीत आहेत. यामुळे जिल्ह्यात राहणाऱ्या सुमारे ६३ टक्के बिगर आदिवासींवर अन्याय झाला असून त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या शनिवारी वाडा येथे छेडलेल्या तिहेरी आंदोलनात हजारोंच्या जनसमुदायाने आंदोलन छेडले होते. गावा-गावात याचीच चर्चा सुरू झाली आहे. (वार्ताहर)