शिक्षकांच्या लैंगिक छळाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, निषेधार्थ लोकांची दिल्ली-नोएडा मार्गावर निदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:39 IST2018-03-22T15:19:29+5:302018-03-22T15:39:59+5:30
पूर्व दिल्लीतील खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीने (१५) उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पंख्याला फास घेऊन आत्महत्या केली.

शिक्षकांच्या लैंगिक छळाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, निषेधार्थ लोकांची दिल्ली-नोएडा मार्गावर निदर्शन
नोएडा : पूर्व दिल्लीतील खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थिनीने (१५) उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पंख्याला फास घेऊन आत्महत्या केली. दोन शिक्षकांनी लैंगिक छळ केला व परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची धमकीही तिला दिल्याचा आरोप तिच्या पालकांनी बुधवारी केला.
पालकांच्या तक्रारीवरून दोन शिक्षकांवर पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणाला अटक झालेली नाही. आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल शाळेच्या प्राचार्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शाळेने मात्र मुलीच्या कुटुंबियांचे आरोप फेटाळले.
पोलिसांनी विद्यार्थीनीच्या घरातून एक नोटबूक जप्त केली आहे. या नोटबूकमध्ये विद्यार्थीनीने तिच्या मानसिक स्थितीबद्दल लिहिलं आहे. यावरून आत्महत्या करण्याआधी विद्यार्थीनी प्रचंड ताणात असल्याचं समजतं आहे. पोलिसांना सापडलेल्या नोटबूकमध्ये विद्यार्थीनीने लिहिलं आहे की, मी अयशस्वी आहे. मी मंद आहे. मी स्वतःचा तिरस्कार करते. वहीतील ज्या पानावर मुलीने ही वाक्य लिहिली आहेत त्याच पानावर तिने स्वतःच्या सह्यासुद्धा केल्या आहेत. वहीतील अक्षर मृत मुलीचंच असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी सकाओळी दिल्लीतील लोकांनी दिल्ली-नोएडा रस्त्यावर निदर्शनं केली. मयूर विहार फेस 1मधील शाळेतील शिक्षकांमुळे घडलेल्या प्रकाराचा लोकांनी निषेध केला.
#Delhi: Group of people block Delhi-Noida road in protest over suicide by a 15-year-old student of Mayur Vihar-Phase-I's Ahlcon Public School. pic.twitter.com/cbxElMpnd5
— ANI (@ANI) March 22, 2018