आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 14:25 IST2025-07-27T14:24:34+5:302025-07-27T14:25:30+5:30
एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
नोएडामधील सेक्टर-३० पोलीस स्टेशन परिसरात एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ५ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूटीवर बसलेले दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले. पोलिसांनी बीएमडब्ल्यूमधील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. कारही जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुल मोहम्मद असं स्कूटी चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो त्याची ५ वर्षांची मुलगी आजारी असल्याने उपचारासाठी तिला चाइल्ड पीजीआय रुग्णालयात घेऊन जात होता. यावेळी त्याच्यासोबत राजा नावाचा एक तरुण देखील होता.याच दरम्यान रुग्णालयाच्या मागच्या बाजुस सेक्टर-३० मध्ये एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने स्कूटीला धडक दिली.
धडक जोरदार असल्याने मुलीचा मृत्यू झाला. गुल मोहम्मद आणि राजा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेल्या अभिषेक आणि यश या दोन तरुणांना घटनास्थळावरून अटक केली आहे आणि कार जप्त केली आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसारस बीएमडब्ल्यूचा वेग खूप जास्त होता. धडक होताच स्कूटीवरील लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर स्कूटरवर बसलेले इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.