शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

प्लाझ्मा दान केल्यावर विमानाचे भाडेही घेतले नाही, राहुल राज यांचा बंगळुरू ते दिल्ली प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:44 IST

plasma : राज दिल्लीत रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित एका अज्ञात रुग्णाचा जीव वाचवा म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी बंगळुरूहून दिल्लीला आले.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची वाढती संख्या काळजी वाढवत असली तरी माणुसकीचेही दुर्लभ दर्शन घडत आहे व ते घडवले आहे, बंगळुरूचे राहुल राज यांनी. राज दिल्लीत रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित एका अज्ञात रुग्णाचा जीव वाचवा म्हणून प्लाझ्मा दान करण्यासाठी बंगळुरूहून दिल्लीला आले. प्लाझ्मा थेरेपी मिळाल्यानंतर त्या रुग्णाच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. दिल्लीतील विजय यांची आई ऊर्मिला कोरोनाबाधित असून त्यांना नऊ एप्रिल रोजी मणिपाल रुग्णालयात दाखल केले गेले. प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरने प्लाझ्मा थेरेपीसाठी एबी पॉझिटिव्ह प्लाझ्माची तरतूद करण्यास सांगितले. बरेच प्रयत्न केल्यावरही दिल्लीत प्लाझ्मा दाता (डोनर) मिळाला नाही. त्यानंतर सोशल मीडियावर आवाहन केले. 

तात्काळ संपर्क- युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी सोशल मीडियावरील वरील आवाहन वाचून बंगळुरूमध्ये राहणारे याच रक्तगटाचे राहुल राज यांच्याशी संपर्क साधला. - राहुल म्हणाले की, जेव्हा मला समजले की, माझ्या प्लाझ्माची दिल्लीतील कोणा रुग्णाला तातडीची गरज आहे. दुसऱ्या दिवशी मी बंगळुरूहून विमानाने थेट दिल्लीतील द्वारकास्थित मणिपाल रुग्णालयात दाखल झालो. - राहुल राज यांनी प्लाझ्मा दान केला व ते परत बंगळुरूला निघाले. विजय यांनी सांगितले की राहुल यांनी विमान भाड्याचेही पैसे घेतले नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याairplaneविमान