अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 00:07 IST2025-10-11T00:07:16+5:302025-10-11T00:07:40+5:30
Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये सत्ता राबवत असलेल्या तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, आज मुत्तकी यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने, या तालिबानी फर्मानाचीच अधिक चर्चा झाली. तसेच त्याबाबत संतापही व्यक्त करण्यात आला.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप
अफगाणिस्तानमध्ये सत्ता राबवत असलेल्या तालिबान सरकारमधील परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, आज त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुत्तकी यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने, या तालिबानी फर्मानाचीच अधिक चर्चा झाली. तसेच त्याबाबत संतापही व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये मुत्तकी यांनी द्विपक्षीय व्यापार, मानवीय मदत आमि सुरक्षा सहकार्यावर चर्चा केली. अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही देशाविरोधात करू दिला जाणार नाही.
मात्र या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना असलेली प्रवेश बंदी हा अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मांडलेल्या मुद्द्यांपेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरला. तसेच पत्रकारांसह सोसल मीडियावरूनही अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेसाठीच्या तालिबानी फर्मानाचा निषेध करण्यात आला.