शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:48 IST

Uttar Pradesh Crime: लग्नाला अनेक वर्ष उलटूनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने अनेक जोडपी विविध वैद्यकीय मार्गांनी अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. मात्र यातील काहीजण वाट चुकून तांत्रिक मांत्रिकांच्या नादी लागतात आणि त्यातून गंभीर गुन्हे घडतात.

लग्नाला अनेक वर्ष उलटूनही अपत्यप्राप्ती होत नसल्याने अनेक जोडपी विविध वैद्यकीय मार्गांनी अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. मात्र यातील काहीजण वाट चुकून तांत्रिक मांत्रिकांच्या नादी लागतात आणि त्यातून गंभीर गुन्हे घडतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे घडली आहे. येथे अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून एका तांत्रिकाने महिलेवर बलात्कार केल्याचे नौझील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित महिलेच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती. मात्र तिला अपत्यप्राप्ती झाली नव्हती. त्यामुळे चिंतीत असलेली ही महिला मुश्ताक नावाच्या तांत्रिकाकडे गेली. त्याने  मंत्रतंत्राच्या मदतीने गर्भधारणा करून देतो, असे या महिलेला सांगितले. त्यानंतर ही महिला त्याच्याकडे गेली असता त्याने तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर पीडित महिला कशीबशी घरी पोहोचली. तसेच तिने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य विचारात घेत पोलिसांनी आरोपी मुश्ताक अली याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलीस अधीक्षक सुरेशचंद्र रावर यांनी सांगितले की,  आरोपी मुश्ताक अली हा ही घटना घडल्यापासून फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची अनेक पथके काम करत आहेत. तसेच त्याच्या शोधासाठी काही ठिकाणी धाडीही घालण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर खळबळ उडाली असून, सदर तांत्रिक चमकारांचं आमिष दाखवून भोळ्याभाबड्या लोकांना शिकार बनवायचा. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश