नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: November 26, 2015 19:41 IST2015-11-26T19:41:13+5:302015-11-26T19:41:13+5:30

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा विराजमान झालेल्या नितीश कुमार यांना अज्ञात व्यक्तीने मेसेजच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Nitish Kumar threatens to kill him | नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी

नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी

ऑनलाइन लोकमत

पटना, दि. २६ - बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा विराजमान झालेल्या नितीश कुमार यांना अज्ञात व्यक्तीने मेसेजच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
नितीश कुमार यांना जीवे मारण्याचा मेसेज येथील एका खाजगी टीव्ही चॅनेलला आला असून या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 
याप्रकरणी, मिळालेल्या मेसेजच्या आधारे अज्ञात व्यक्तीच्याविरोधात येथील श्रीकृष्ण पुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय दंड संहिता कलम ३८७ नुसार एखाद्याला जीवे मारण्याची धमकी देणे, गंभीर जखमी करण्याची धमकी देणे किंवा जबरदस्तीने खंडणी मागणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, मेसेज कोणी पाठविला यासंदर्भात अधिक तपास सुरु असल्याचेही पालिसांनी सांगितले. 

Web Title: Nitish Kumar threatens to kill him