ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:59 IST2025-11-20T11:57:28+5:302025-11-20T11:59:07+5:30
Nitish Kumar Bihar CM: भाजपकडून सम्राच चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांना उप-मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.

ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
Nitish Kumar Bihar CM: बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर, आज (दि.20) पाटण्यातील गांधी मैदानावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यात नितीश कुमार यांनी 10 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, त्यांच्यासोबत भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी दुसऱ्यांदा उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज एकूण 26 मंत्र्यांना राज्यपालांनी गोपनीयतेची शपथ दिली.
आजच्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजप/NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
शपथ घेण्यापूर्वी नितीश मंत्रिमंडळातील मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. नवीन सरकारमध्ये भाजपचे 14 मंत्री असतील. तर, जेडीयूमधून 7, लोजपा(रामविलास) पक्षाचे 2, जितन राम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) मध्ये प्रत्येकी एक मंत्री असेल. जितन राम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन हे त्यांच्या पक्षाकडून मंत्री म्हणून शपथ घेतील, तर उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र दीपक प्रकाश हे मंत्री म्हणून शपथ घेतील.
नवीन मंत्र्यांची संपूर्ण यादी
- सम्राट चौधरी
- विजय कुमार सिन्हा
- विजय कुमार चौधरी
- बिजेंद्र प्रसाद यादव
- श्रवण कुमार
- मंगल पांडेय
- डॉ. दिलीप जायसवाल
- अशोक चौधरी
- लेसी सिंह
- मदन सहनी
- नितिन नवीन
- रामकृपाल यादव
- संतोष कुमार सुमन
- सुनील कुमार
- मोहम्मद जमा खान
- संजय सिंह टायगर
- अरुण शंकर प्रसाद
- सुरेंद्र मेहता
- नारायण प्रसाद
- रमा निषाद
- लखेंद्र कुमार रोशन
- श्रेयसी सिंह
- डॉ. प्रमोद कुमार
- संजय कुमार
- संजय कुमार सिंह
- दीपक प्रकाश