शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींची खासदाराला भन्नाट ऑफर; वजन कमी करा, दर किलोमागे १००० कोटी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 18:12 IST

अलीकडेच नितीन गडकरी यांनी अमरावती ते अकोला ७५ किमी हायवे अवघ्या ५ दिवसांत बनवून दाखवला.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या विकासकामांमुळे देशभरात चर्चेत असतात. सत्ताधारी पक्षाचे नेते असले तरी नितीन गडकरींसोबत चांगले संबंध विरोधी पक्षासोबत सगळ्यांशी आहेत. गडकरी यांच्याकडे रस्ते व महामार्ग विकास मंत्रालय आहे. देशभरातील रस्त्यांच्या प्रकल्पात त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आता नितीन गडकरींनी भाजपा खासदाराला दिलेल्या एका ऑफरमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. 

नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील खासदार अनिल फिरोजिया(Anil Firojia BJP)  यांना कोट्यवधीची ऑफर दिलीय. या वजनदार नेत्याला त्याचे वजन कमी करण्यासाठी गडकरींनी ही ऑफर दिली. या खासदाराचे वजन १२७ किलो होते. वजन कमी करा जर हे शक्य केले तर त्यांना कमी होणाऱ्या प्रत्येक किलो वजनामागे १ हजार कोटी देण्याचं आश्वासन गडकरींनी दिले. विश्वास बसला नसेल परंतु गडकरींनी त्यांच्या हटके कामानं सर्वांनाच आश्चर्य केले आहे. 

अलीकडेच नितीन गडकरी यांनी अमरावती ते अकोला ७५ किमी हायवे अवघ्या ५ दिवसांत बनवून दाखवला. त्याची नोंद गिनीज बुकात झाली. आगामी काळात भारतातील रोड हे अमेरिकेसारखे असतील असंही गडकरी कायम सांगतात. नितीन गडकरी जे बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळे गडकरींनी दिलेली ऑफरही चर्चेत आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलेली ऑफर खासदार अनिल फिरोजिया यांनीही चांगलीच मनावर घेतली. 

आता फिरोजिया यांनी निश्चिय केलाय की, २७ किलो वजन कमी करणार, मग नितीन गडकरींनी २७ हजार कोटी द्यावे लागतील. गडकरी इतका पैसा आणणार कुठून? की इथंदेखील पीडीपी मॉडेल वापरणार? अशी चर्चा होती. खासदार अनिल फिरोजिया यांना ही ऑफर नितीन गडकरींनी २४ फेब्रुवारीला दिली होती. त्यानंतर गडकरींची ऑफर पाहून फिरोजिया यांनी ४ महिने डायट प्लॅन, मेहनत घेत १५ किलो वजन कमी करून दाखवले. त्यामुळे आता नितीन गडकरींना १५ हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. फेब्रुवारीत गडकरी विकास कामांचे उद्धाटन करण्यासाठी उज्जैनला पोहचले होते. तेव्हा ही ऑफर दिली होती. अनिल फिरोजिया यांनीही ती ऑफर मनावर घेतली आणि वजन कमी केले. त्यामुळे हा गडकरी उज्जैनच्या विकास कामासाठी निधी म्हणून १५ हजार कोटी देणार असल्याची बातमी आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा