दिल्लीतील इमारतीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू; आजीसह तीन अल्पवयीन नातींचा मृतांमध्ये समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:28 IST2026-03-19T11:27:43+5:302026-03-19T11:28:16+5:30
पालम मेट्रो स्थानकानजीकच्या राम चौक मार्केट क्षेत्रातील पाच मजली इमारतीला सकाळी सातच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग पसरल्याने घाबरलेल्या वडिलांनी दीड वर्षांच्या मुलीसह इमारतीवरून उडी मारल्याने जखमी झाले.

दिल्लीतील इमारतीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू; आजीसह तीन अल्पवयीन नातींचा मृतांमध्ये समावेश
नवी दिल्ली : नैऋत्य दिल्लीतील पालम क्षेत्रातील एका बहुमजली इमारतीला बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. मृतांमध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेचा व तिच्या तीन नातींचा समावेश आहे. यापैकी एका नातीचे वय केवळ तीन वर्षे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पालम मेट्रो स्थानकानजीकच्या राम चौक मार्केट क्षेत्रातील पाच मजली इमारतीला सकाळी सातच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग पसरल्याने घाबरलेल्या वडिलांनी दीड वर्षांच्या मुलीसह इमारतीवरून उडी मारल्याने जखमी झाले.
२५ हून अधिक दुकाने खाक
अहमदाबाद : अहमदाबादमधील गजबजलेल्या कालूपुर भागातील 'रेवडी बाजार' या घाऊक कापड मार्केटमध्ये बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत २५ हून अधिक दुकाने जळून खाक झाली असून कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुपारी १:३५ च्या सुमारास ही आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३६ गाड्या घटनास्थळी पाचारण कराव्या लागल्या.