शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एनजीओला हवेत ८० जणांचे राजीनामे

By admin | Updated: December 25, 2016 01:01 IST

२७ वर्षांपासून दलितांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या गुजरातमधील नवसर्जन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने आपल्या ८० कर्मचाऱ्यांचे राजीनामे मागितले आहे. केंद्राने या संस्थेला

अहमदाबाद : २७ वर्षांपासून दलितांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या गुजरातमधील नवसर्जन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने आपल्या ८० कर्मचाऱ्यांचे राजीनामे मागितले आहे. केंद्राने या संस्थेला परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीसाठीचा फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेग्यूलेशन अ‍ॅक्टचा (एफसीआरए) परवाना रद्द केल्यामुळे आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे कारण या संस्थेने दिले आहे. तर, या संस्थेकडून चालविण्यात येत असलेल्या आणखी तीन शाळाही बंद करण्यात येणार आहेत. तथापि, केंद्राच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त मार्टिन मॅकवान यांनी सांगितले की, एफसीआरए अंतर्गत मिळणाऱ्या परदेशी निधीचा परवाना केंद्र सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे या स्वयंसेवी संस्थेला आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अशक्य झाले आहे. परिणामी आम्ही आमच्या ८० कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितला आहे. या संस्थेला दरवर्षी २.७५ कोटी रुपये खर्च येतो. त्यासाठीचा बहुतांशी खर्च परदेशी निधीतून भागवण्यात येत असे, या खर्चातील ८५ टक्के वाटा परदेशांमधून येत होता. ही संघटना दलितांच्या जागरुकतेसाठीही कार्यरत आहे. याशिवाय सुरेंद्रनगर आणि पाटन जिल्ह्यात तीन शाळाही या संस्थेकडून चालविण्यात येतात. पाचवी ते नववीचे १०२ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. पण, निधीअभावी या शाळाही आता बंद कराव्या लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. उना येथे दलितांना स्वयंभू गोरक्षकांनी मारहाण केली होती. हे प्रकरण आम्ही उचलून धरले म्हणून आमच्या संस्थेला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही केवळ दलितांची वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला. २७ वर्षांपासून आम्ही हे काम करत आहोत. पण, सरकारला असे वाटते की, आम्ही असा प्रचार करावा की, या शासन काळात सर्व काही सुरळीत चालू आहे. (वृत्तसंस्था)