शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबीय पाहणार 'रंगून'

By admin | Updated: February 22, 2017 11:34 IST

'रंगून'चे निर्माते आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांना हा सिनेमा दाखवण्यासाठी तयारी करत आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - कंगना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा 'रंगून' दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सिनेमाची कहाणी सन 1940 च्या दरम्यानची आहे. यामध्ये देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जवानांनी दिलेला उत्स्फुर्त लढादेखील पाहायला मिळणार आहे. 
 
हा तोच काळ आहे, ज्यादरम्यान सुभाषचंद्र बोसदेखील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिकेत होते. या कारणामुळे 'रंगून'चे निर्माते आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांना हा सिनेमा दाखवण्यासाठी तयारी करत आहेत. 
कोलकातामध्ये ज्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबीय राहतात, त्याच ठिकाणी 'रंगून'चे निर्माते सिनेमाच्या स्क्रीनिंगचे आयोजन करणार आहेत.
 
दरम्यान, सिनेमामध्ये नेताजींची भूमिका पाहायला मिळणार आहे की नाही, ही बाब अजूनही स्पष्ट झालेली नाही. मात्र 'रंगून' सिनेमा दाखवण्याची मागणी नेताजींच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. 'रंगून'  हा सिनेमा दुस-या महायुद्धादरम्यानच्या कटकारस्थान, युद्ध आणि प्रेम कहाणीवर आधारित आहे.
 
सिनेमाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांना रंगून सिनेमा दाखवण्यामागील प्रमुख कारण म्हणजे याच काळादरम्यान सुभाषचंद्र बोसदेखील देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी लढा देत होते'. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कंगनानं 'रंगून'चे प्रमोशन करण्यासाठी जम्मू काश्मीर येथे जाऊन जवानांची भेट घेतली. 'रंगून' सिनेमाचे दिग्दर्शक विशाल भारद्वाज असून येत्या 24 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.