शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

जेईई-नीट परीक्षा स्थगितीसाठी सपाच्या कार्यकर्त्यांचा राजभवनला घेराव, पोलिसांकडून लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 7:10 PM

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्णयाला विरोध करत राजभवनाला घेराव घातला.

ठळक मुद्देपोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलन करणाऱ्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

लखनऊ : देशात कोरोना संकट काळात केंद्र सरकारने जेईई (मुख्य) आणि नीट परीक्षा देखील घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा घेण्याच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर टीका असून अनेक राजकीय पक्षांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. 

याच पार्श्वभूमीवर गुरुवारी उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्णयाला विरोध करत राजभवनाला घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडविला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलन करणाऱ्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

दरम्यान, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जेईई (मुख्य) आणि नीट परीक्षांमध्ये सुमारे 28 लाख विद्यार्थी भाग घेणार आहेत. कोरोना साथीच्या आजारामुळे अनेक पक्षांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, परीक्षा आयोजित करणाऱ्या एनटीएने म्हटले आहे की, दोन्ही परीक्षा वेळेवर होतील. त्यासाठी एनटीएने प्रवेश पत्रही जारी केले आहे.

काँग्रेसचे उद्या महाराष्ट्रात आंदोलन मुंबई : कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, या मागणीसाठी उद्या (शुक्रवारी) राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

जगभरातील १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांचं नरेंद्र मोदींना पत्रभारतासह जगभरातील विद्यापीठांच्या १५० हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी या परीक्षांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षा जेईई (मेन) आणि नीट या परीक्षांना अजून विलंब झाला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा विपरीत परिणाम होईल, असे शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.याचबरोबर, काही लोक आपल्या राजकीय अजेंड्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्य़ांच्या भविष्यासोबत खेळत आहेत. तरूण आणि विद्यार्थी वर्ग हे देशाचे भविष्य आहे. मात्र, त्यांच्या पुढील वाटचालीवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. प्रवेशाबाबत आणि अन्य प्रक्रियांबाबत अनेक शंका असून त्या लवकरात लवकर सोडवल्या गेल्या पाहिजेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आणखी बातम्या...

उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात  

Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम  

"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"

'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...    

 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीexamपरीक्षा