रोहित पवार आता अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला; बैठकीत नेमके काय घडले? मोठी माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:28 IST2026-03-07T15:26:00+5:302026-03-07T15:28:24+5:30
NCP SP Group Rohit Pawar Meets Arvind Kejriwal In Delhi: रोहित पवार यांनी दिल्लीत जाऊन अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांची भेट घेतली.

रोहित पवार आता अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला; बैठकीत नेमके काय घडले? मोठी माहिती समोर
NCP SP Group Rohit Pawar Meets Arvind Kejriwal In Delhi: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याकडे असलेली सूत्रे हाती घेऊन राजकारणात सक्रीय झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. वेगवेगळे दावे आणि खळबळजनक खुलासे करत आहेत. यातच रोहित पवार यांनी दिल्ली गाठत अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.
उपमुखमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशयाची सुई असलेल्या व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के सिंग यांची सलग आठ तास चौकशी करण्यात आल्याचे चित्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) रंगवले. असले तरी प्रत्यक्षात सीआयडीकडून त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. यानंतर लगेचच दिल्ली गाठत अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
संपूर्ण माहितीचे प्रेझेंटेशन दिले
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. देशातील लढवय्ये नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि गेल्या काही दिवसांपासून याबाबत जमा केलेल्या संपूर्ण माहितीचं प्रेझेंटेशन त्यांना दिले. त्यांनीही याबाबतचे सगळे तपशील बारकाईने समजून घेतले. अजितदादांना न्याय मिळण्यासाठी आणि देशात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये आणि त्यात कुणाचाही बळी जाऊ नये यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी या विषयावर ‘आप’च्या खासदारांनी संसदेत आवाज उठवावा अशी विनंतीही त्यांना केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते, असे रोहित पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाची संसदेतील धगधगती तोफ खा. संजय सिंह यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून जमा केलेल्या संपूर्ण माहितीचं प्रेझेंटेशन त्यांना दिले. त्यांनीही याबाबतचे तपशील बारकाईने जाणून घेतले घेतले आणि आमच्या विनंतीनुसार अजितदादांना न्याय मिळण्यासाठी या विषयावर राज्यसभेत आवाज उठवण्याचं आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते, असे रोहित पवार यांनी सांगितले.
देशातील लढवय्ये नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल साहेब यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि गेल्या काही दिवसांपासून याबाबत जमा केलेल्या संपूर्ण माहितीचं प्रेझेंटेशन त्यांना दिलं. त्यांनीही याबाबतचे सगळे तपशील… pic.twitter.com/e8wNoCt9mv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 7, 2026