शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्हच, पण...; रोहित पवार यांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 11:37 IST

'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतीं यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य.

ठळक मुद्दे'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; उमा भारतीं यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देशातील ब्युरोक्रसीवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी ब्यूरोक्रसी म्हणजेच नोकरशाहीला चप्पल उचलणारे म्हटलं आहे. 'नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमच्या चपला उचलण्याचे काम करतात,' असं उमा भारती म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. भाजप नेत्या उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले.

"भाजप नेत्या उमा भारती यांचं अधिकाऱ्यांबाबतचं वक्तव्य हे निषेधार्हच आहे. केंद्र सरकारकडून ED, CBI, IT या केंद्रीय संस्थांचा होणारा गैरवापर बघितला तर हेच वक्तव्य त्यांनी अधिकाऱ्यांबाबत न करता या संस्थांबाबत केलं असतं तर योग्य ठरलं असतं," असं म्हणत रोहित पवार यांनी उमा भारती यांनी निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर निशाणा साधला.काय म्हणाल्या होत्या उमा भारती?मध्यप्रदेशात दारुबंदीविरोधात आंदोलन सुरू करणाऱ्या उमा भारती शिवराज सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहेत. आता त्यांच्या या ब्युरोक्रसीवर केलेल्या वक्तव्यामुळे सरकारच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. "नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमची चप्पल उचलण्यासाठी आहे. ते आमच्या चपला उचलतात. तुम्हाला काय वाटतं नोकरशाह नेत्याला फिरवतात, तसं अजिबात नाही," असं त्या म्हणाल्या होत्या.

आधी खाजगीत चर्चा केली जाते, नंतर नोकरशाह फाईल बनवून आणतात. आमच्या सांगण्याशिवाय ते काहीच काम करत नाहीत. आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. ब्युरोक्रसीच्या बहाण्याने आम्हीच राजकारण करतो', असं वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केलं होतं.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारUma Bhartiउमा भारतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेशTwitterट्विटर