पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 05:14 PM2021-05-26T17:14:44+5:302021-05-26T17:15:57+5:30

Coronavirus Ventilators : यापूर्वी बहुतांश व्हेंटिलेटर्समध्ये आढळल्या होत्या त्रुटी. पीएम केअर्स फंडातील निधीतून महाराष्ट्राला मिळाले होते २०९१ व्हेंटिलेटर्स

ncp jayant patil slams pm cares fund ventilators maharashtra coronavirus covid 19 | पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी : जयंत पाटील

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी : जयंत पाटील

Next
ठळक मुद्देयापूर्वी बहुतांश व्हेंटिलेटर्समध्ये आढळल्या होत्या त्रुटी. पीएम केअर्स फंडातील निधीतून महाराष्ट्राला मिळाले होते २०९१ व्हेंटिलेटर्स

"पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोलही केला.

"पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर निकामी निघाल्याची बातमी ऐकली. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागचा सुत्रधार कोण ? कोण गैरफायदा घेत आहे ? याचा छडा लागायला हवा," असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली. 

त्रुटी आढळल्या

पीएम केअर्स निधीतून महाराष्ट्राला जवळपास २०९१ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. मात्र, त्यातील तब्बल २७६ व्हेंटिलेटर विविध त्रुटींमुळे बंद असल्याचे आढळले होते, तर २३९ व्हेंटिलेटर वापराविना पडून असल्याचे लोकमतच्या चमूने राज्यभरातून मिळविलेल्या माहितीत आढळले होते. बहुतांश बंद व्हेंटिलेटरना ऑक्सिजन सेन्सर, कनेक्टरच नसल्याने ते वापरण्यायोग्य नाहीत. शिवाय, काहींची आयसीयूत वापरण्याची क्षमता नसल्याचेही स्पष्ट झाले होते. अनेक व्हेंटिलेटरमध्ये फ्यूज नसणे, वायर तुटणे, सिग्नल नसणे अशाही त्रुटी आढळल्या होत्या.
 

Web Title: ncp jayant patil slams pm cares fund ventilators maharashtra coronavirus covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.