डाव्या विचारसरणीमुळे नक्षलवाद वाढला; सत्तेसाठी आदिवासींना भडकावले, शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 19:01 IST2026-03-30T19:01:01+5:302026-03-30T19:01:45+5:30

‘नक्षलवाद संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध’; लोकसभेत अमित शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

Naxalites should surrender; henceforth bullets will be answered with bullets, warns Amit Shah | डाव्या विचारसरणीमुळे नक्षलवाद वाढला; सत्तेसाठी आदिवासींना भडकावले, शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

डाव्या विचारसरणीमुळे नक्षलवाद वाढला; सत्तेसाठी आदिवासींना भडकावले, शाहांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

नवी दिल्ली : लोकसभेत ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशाला दीर्घकाळापासून नक्षलवादाचा त्रास होता; मात्र आता त्यातून देशाची मुक्तता झाली आहे. बस्तर विभागातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आला आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

बस्तरमध्ये विकासकामांवर भर

शाह म्हणाले की, देशातील 12 राज्ये नक्षलवादाने प्रभावित होती. डाव्या विचारसरणीमुळे या राज्यांमध्ये नक्षलवाद पसरला होता. मात्र आता बस्तर परिसरातून नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. लाल दहशतीमुळे त्या भागात विकास झाला नव्हता. पण, आता बस्तरमधील प्रत्येक गावात शाळा उभारण्यात आल्या. यापुढे जो कोणी शस्त्र उचलेल, त्याला कायद्याने उत्तर दिले जाईल.

नक्षल विचारसरणीत सत्ता बंदुकीतून येते

यावेळी शाहांनी विरोधकांवर आरोप केला की, त्यांना नक्षलवाद्यांची सहानुभूती आहे, पण आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी काही केले नाही. नक्षलवादी विचारसरणीनुसार सत्ता बंदुकीच्या जोरावर मिळते. नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकांना भडकावून त्यांना शस्त्रे दिली आणि हिंसाचाराच्या मार्गावर नेले. नक्षलवादाचा विकासाशी काहीही संबंध नाही. उलट नक्षलवादामुळे त्या भागांमध्ये विकास थांबला होता.

रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवादामुळे गरिबी वाढली

रेड कॉरिडॉरमध्ये नक्षलवादामुळे गरिबी वाढली. नक्षलवाद्यांनी शाळा जाळल्या, त्यामुळे आदिवासी मुलांना शिक्षण मिळू शकले नाही. 75 वर्षांत 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मग आदिवासी विकासापासून वंचित का राहिले? देश अनेक वर्षे नक्षलवादामुळे त्रस्त होता आणि आता नक्षलमुक्त भारताच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकास होत असल्याचा दावा शाहांनी केला.

नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत

अमित शाहांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, शस्त्रे खाली ठेवणाऱ्यांना सरकार मदत करेल, पण शस्त्रांनी हिंसा करणाऱ्यांना आता कठोर उत्तर दिले जाईल. नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत, अन्यथा सरकार आता गोळीला गोळीने उत्तर देईल, असा थेट इशारा शाहांनी दिला.

Web Title : वामपंथी विचारधारा ने नक्सलवाद को बढ़ावा दिया; सत्ता के लिए आदिवासियों को उकसाया: शाह ने कांग्रेस पर हमला किया

Web Summary : अमित शाह ने नक्सलवाद के लिए वामपंथी विचारधारा को दोषी ठहराया और कांग्रेस पर आदिवासी विकास की उपेक्षा करने और हिंसा भड़काने का आरोप लगाया। उन्होंने दावा किया कि विकास के कारण बस्तर अब नक्सल मुक्त है, और नक्सलियों से हथियार डालने या मोदी के नेतृत्व में परिणाम भुगतने का आग्रह किया।

Web Title : Leftist ideology fueled Naxalism; incited tribals for power: Shah attacks Congress

Web Summary : Amit Shah blames leftist ideology for Naxalism, accusing Congress of neglecting tribal development and inciting violence. He claims Bastar is now Naxal-free due to development, urging Naxals to disarm or face consequences under Modi's leadership.