शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Nawab Malik: अखेर दाढीवाला काशिफ खान समोर आला; नवाब मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:30 IST

Nawab Malik vs Sameer Wankhede: मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप ऐकून मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटलं असं काशिफनं म्हटलं आहे.

नवी दिल्ली – मुंबई क्रुझ ड्रग्ज(Mumbai Cruise Drugs Party) प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. यात क्रुझवरील पार्टीत असणारा दाढीवाला कोण? त्याला वानखेडे यांनी सोडून दिले असा आरोप केला. हा दाढीवाला म्हणजे काशिफ खान याबाबत मलिकांनी एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर सेक्स रॅकेट आणि ड्रग्ज माफिया असल्याचा आरोप केला होता.

काशिफ खान (Kashif khan) हा फॅशन टीव्ही इंडियाचा मालक आहे. आजतकशी बोलताना काशिफ खाननं मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. काशिफ खान म्हणाला की, नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. माझं कुठल्याही सेक्स रॅकेट अथवा ड्रग्जच्या उद्योगाशी संबंध नाही. फॅशन टीव्ही आयोजिक एका कार्यक्रमासाठी आम्ही क्रुझवर आयोजक म्हणून होतो. स्वत: तिकीट घेऊन त्या क्रुझवर गेलो  होतो. क्रेडिट कार्डमधून खाण्यापिण्याचे बिल भागवलं त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असंही काशिफ खान म्हणाला.

तसेच मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप ऐकून मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटलं. ते मंत्री आहेत. ताकदवान माणूस आहे. मी त्यांचा आदर करतो. ते जे आरोप करतायेत त्याने हैराण आहे. आधी सर्व तथ्य ओळखा मग बोला. माझा सेक्स रॅकेट आणि ड्रग्जशी काहीही संबंध नाही. आर्यन खानला मी क्रुझवर पाहिलंही नाही. मला ड्रग्जबद्दल काही माहिती नाही. मी फक्त आयोजक म्हणून तिथे उपस्थित होतो असं स्पष्टीकरण काशिफ खानने दिले आहे.

मी कुठल्याही चौकशीला तयार

समीर वानखेडे यांना मी कधी भेटलो नाही. माझा त्यांच्याशी संवाद नाही. कुठल्याही प्रकारच्या चौकशीला मी सामोरं जाण्यास तयार आहे. या प्रकरणाशी निगडीत तपास यंत्रणांना मी सहकार्य करेन. क्रुझ पार्टीचे आयोजक दिल्लीतील कंपनी आहे. या टीमला आमची माणसं भेटली होती. ते कोण आहेत याची माहिती नाही असं काशिफ खान यांनी सांगत नवाब मलिकांनी लावलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत.

काय म्हणाले नवाब मलिक?

क्रूझवर एक दाढीवाला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर आपल्या प्रेयसीसोबत नाचत होता, तो एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मित्र असल्याचा दावा मलिकांनी केला होता. मलिक यांनी फॅशन टीव्ही इंडियाचा एमडी काशिफ खान (Kashif khan) याचे नाव घेतले. या काशिफ खानवर देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत, दाढीवाल्या व्यक्तीला मलिक यांनी एक आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया म्हटले होते. त्याच्याशी संबंध असल्याने क्रूझवर तो असूनही समीर वानखेडे यांनी त्याला अटक केली नाही तसेच त्याची चौकशीही केली गेली नाही. या क्रूझवरील पार्टीबाबत कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. एनसीबी काशिफ खानवर कारवाई का करत नाहीय, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी