शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

करोडो लोकांच्या हितासाठी सरकारचं मोठं पाऊल, National Pension System चे बदलले नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 12:21 IST

NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम हा एक बचतीसाठीचा लोकप्रिय पर्याय आहे.

नवी दिल्ली - करोडो लोकांच्या हितासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. National Pension System चे नियम बदलले आहेत. NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम हा एक बचतीसाठीचा लोकप्रिय पर्याय आहे. 1 मे 2009 पासून खासगी क्षेत्रातील किंवा असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी सुद्धा ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या योजनेत 2 कोटी ग्राहक जोडले गेले आहेत. ही एक पेन्शन बचत योजना असून भविष्यात आर्थिक सुरक्षा देते. एनपीएसद्वारे आपण 60 हजार रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी कशा प्रकारे प्लॅनिंग करू शकता असा एक प्रश्न आहे. मात्र  यासंदर्भात एका मोठ्या नियमात सरकारने बदल केला आहे.

एनपीएसचा बदलला नियम  नॅशनल पेन्शन सिस्टमचे जुने सब्सक्रायबर्स म्हणजेच ज्यांनी वेळेपूर्वी ही योजना सोडली आहे ते पुन्हा यामध्ये सामील होऊ शकतात. पीएफआरडीएने यासाठी परवानगी दिली आहे. नियमांनुसार, ग्राहक वयाची 60 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच यातून बाहेर पडू शकतात. जेव्हा एनपीएसमधील गुंतवणूक मॅच्यूअर होते, तेव्हा गुंतवणूकदारास नियमित पेन्शनच्या स्वरूपात 80% रक्कम मिळते, तर उर्वरित 20% रक्कम एकरकमी काढून घेता येते. आता ज्यांनी 20 टक्के पैसे काढले आहेत आणि त्यांना पुन्हा एनपीएसमध्ये जोडले जायचे असेल तर त्यांना ही रक्कम जमा करावी लागेल. या व्यतिरिक्त ते नियमित पेन्शन घेऊन विड्रॉल पेन्शन प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यानंतर, ते नवीन एनपीएस खाते उघडू शकतात.

NPS: प्रीमॅच्यूअर एक्झिटच्या नियमांमध्ये बदल

पीएफआरडीएने या ग्राहकांना नॅशनल पेन्शन सिस्टमचा पर्याय दिला आहे. नॅशनल पेन्शन सिस्टम आपल्या ग्राहकांना निवृत्तीसाठी कमी किंमतीवरील पेन्शन फंडच्या माध्यमातून एक संधी देते. एनपीएसच्या फायद्यातील फीचर्समध्ये पोर्टेबिलिटी, लवचिकता, योगदानाचे वाटप करण्याचे विविध सोप्या मार्ग, पेन्शन फंडाच्या पर्यायाचा समावेश आहे. 

PRAN म्हणजे काय?, आता पुढे काय होणार? 

एनपीएस अंतर्गत सब्सक्रायबर्सना परमनेंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर (PRAN) दिला जातो. जो यूनिक असतो. सब्सक्रायबर्सकडे एकावेळी एक सक्रीय PRAN असू शकतो. त्यामुळे ते सध्याचे एनपीएस खाते बंद केल्यानंतरच नवीन खाते उघडू शकतात. प्रीमॅच्यूअर एक्झिटच्या परिस्थितीत PRAN मध्ये जमा असणाऱ्या फंडपैकी 20 टक्के पर्यंतची रक्कम एकरकमी काढता येते. उर्वरित 80 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम PFRDA द्वारे अ‍ॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हाईडर (एएसपी) कडून Annuity योजना खरेदी करण्यासाठी वापरतील. 

यासाठी काय करावे लागले?

नवीन PRAN सह नवीन एनपीएस खाते उघडा. एनपीएस त्याच PRAN सुरू ठेवण्यासाठी प्रथम काढलेली रक्कम (20 टक्क्यांपर्यंत) आपल्या एनपीएस खात्यात (PRAN) जमा करा. सध्याचे PRAN सुरू ठेवण्यासाठी, पुन्हा डिपॉझिट करण्याचा पर्याय एकदा मिळू शकेल आणि एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. 18 ते 60 वयोगटातील कोणताही पगारदार व्यक्ती एनपीएसमध्ये सामील होऊ शकेल. एनपीएसमध्ये दोन प्रकारची खाती आहेत.Tier-I आणि Tier-II. टियर -I एक सेवानिवृत्ती खाते आहे, जे प्रत्येक सरकारी कर्मचार्‍यास उघडणे अनिवार्य आहे. तर Tier-II एक स्वयंसेवी खाते आहे, ज्यामध्ये कोणताही पगारदार व्यक्ती त्याच्या वतीने गुंतवणूक सुरू करू शकते आणि कोणत्याही वेळी पैसे काढू शकते.

कशी मिळेल महिन्याला 60 हजार रुपये पेन्शन? 

जर 25 वर्षांच्या वयामध्ये या योजनेत सामील होत असाल तर 60 वर्षे वयाच्या म्हणजेच 35 वर्षापर्यंत तुम्हाला योजने अंतर्गत दरमहा 5000 रुपये जमा करावे लागतील. तुमची एकूण गुंतवणूक 21 लाख रुपये असेल. जर एनपीएसमधील एकूण गुंतवणुकीचा अंदाजित परतावा 8 टक्के असेल तर एकूण कॉर्पस 1.15 कोटी रुपये असेल. यापैकी 80 टक्के रकमेसह जर तुम्ही Annuity खरेदी केली तर ते मूल्य जवळपास 93 लाख रुपये असेल. Annuity रेट 8 टक्के असल्यास वयाच्या 60 व्या वर्षानंतर नंतर दरमहा 61 हजार रुपये पेन्शन मिळेल. तसेच 23 लाख रुपयांचा वेगळा निधीही मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"भारताला डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवतेय"

"भारतीय हवाई दलात पाकिस्तान आणि चीनला एकाचवेळी चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद"

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी! 

"कांद्याच्या निर्यात बंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा घोटाळाच, सरकार ऐकत का नाही?", शिवसेनेचा हल्लाबोल

भाजपा आणि जन अधिकार पक्षाचे कार्यकर्ते भिडले; जोरदार 'राडा' अन् तुफान हाणामारी, Video व्हायरल 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनIndiaभारतMONEYपैसा