शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जामिया युनिव्हर्सिटीची वेबसाइट हॅक, लिहिलं, 'Happy Birthday Pooja'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 1:05 PM

जामिया मिल्लिया इस्लामियाची अधिकृत वेबसाइट www.jmi.ac.inला रात्री 12 वाजता हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सनं वेबसाइटच्या पूर्ण स्क्रीनला ब्लॅक करून टाकलं असून, त्यावर हॅपी बर्थडे पूजा असं लिहिलं आहे.

नवी दिल्ली- जामिया मिल्लिया इस्लामियाची अधिकृत वेबसाइट www.jmi.ac.inला रात्री 12 वाजता हॅक करण्यात आली आहे. हॅकर्सनं वेबसाइटच्या पूर्ण स्क्रीनला ब्लॅक करून टाकलं असून, त्यावर हॅपी बर्थडे पूजा असं लिहिलं आहे. तसेच स्क्रीनच्या खाली लाल रंगाच्या छोट्या अक्षरात 'Your LOVE' असेही शब्द लिहिलेले पाहायला मिळतायत.तसेच वेबसाइटच्या खालच्या बाजूला सफेद रंगात T3AM लिहिल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर ही बातमी वा-यासारखी पसरली आहे. सोशल मीडियावर युझर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता पूर्ण जामियाला समजलं असेल की, 22 मे रोजी पूजाचा जन्मदिवस आहे, अशी प्रतिक्रिया एक युझर्सनं दिली आहे. कोणत्या तरी टेक्नोसेव्ही चाहत्यानं वेबसाइट हॅक केल्याचंही दुसरा एक युझर्स म्हणाला आहे. परंतु जामिया युनिव्हर्सिटीची वेबसाइट कोणी हॅक केली आहे, याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली होती. त्यावेळी ब्राझीलच्या हॅकर्सवर शंका उपस्थित केली गेली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण वेबसाइटवर “hackeado por HighTech Brazil HackTeam”  लिहिलेलं होतं. तसेच गेल्या वर्षी केंद्रीय गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि कायदा आणि कामगार मंत्रालयाचीही वेबसाइटही हॅक करण्यात आली होती. 

टॅग्स :Crimeगुन्हाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल