शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आता मिड डे मिल सोबत नाश्ताही मिळणार; नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासही होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 13:56 IST

नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याचीही तरतूद

मुंबई: सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासोबत नाश्ताही देण्यात यावा, अशी सूचना नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये मुलांना भोजनासोबत नाश्ताही मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं याच आठवड्यात नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी नाश्त्याची आवश्यकता असते. त्यामुळे मध्यान्ह भोजनेच्या योजनेचा आणखी विस्तार करण्यात यावा, अशी शिफारस नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.'विद्यार्थ्यांना पुरेशी पोषणमूल्य मिळत नसल्यास त्यांना व्यवस्थित अभ्यास करता येत नाहीत. शरीरासाठी आवश्यक घटक न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासोबत शारीरिक विकासदेखील गरजेचा आहे. शाळेत प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, समुपदेशक असणं आवश्यक आहे,' असं नवं शैक्षणिक धोरण सांगतं.'पौष्टिक नाश्ता केल्यानंतर सकाळचे काही तास अभ्यासासाठी उत्तम असल्याचं सर्वेक्षण सांगतं. या कालावधीत विद्यार्थी अवघड विषयांचा अभ्यास करू शकतात. त्यामुळे या वेळेत विद्यार्थ्यांना साधाच, पण पोषणमूल्य असलेला ब्रेकफास्ट दिला जाऊ शकतो,' असं धोरणात नमूद करण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी गरम जेवण देणं शक्य नसेल, तिथे साधं, पण पौष्टिक जेवण देता येऊ शकेल. अशा भागांमध्ये शेंगदाणा किंवा चणे गूळ आणि स्थानिक फळांसोबत एकत्र येऊन दिले जाऊ शकतात, असा पर्याय शैक्षणिक धोरणातून सुचवण्यात आला आहे.नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. 'सर्व शालेय विद्यार्थ्यांची ठराविक कालावधीतून आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्याची नोंद असणारं आरोग्यपत्र देण्यात यावं,' अशी सूचना धोरणात करण्यात आली आहे. मुलाचं वय ५ वर्ष होण्यापूर्वी त्यांना बालवाटिकेत पाठवण्यात यावं, असा सल्ला देण्यात आला आहे.