शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीतून नाशिककरांची सुटका

By admin | Updated: January 6, 2015 00:07 IST

हटले धुके : थंडीची तीव्रता झाली कमी

हटले धुके : थंडीची तीव्रता झाली कमीनाशिक : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धुक्याच्या पखरणीतून आणि कडाक्याच्या थंडीतून सोमवारी नाशिककरांची सुटका झाली. किमान तपमानात वाढ झाली नसली, तरी धुके हटल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प˜्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण तयार झाले होते. नाशिकमध्ये तर ग्रामीण भागात गारपीटही झाली होती. राज्यातील सर्वात कमी तपमानाची नोंद मध्यंतरीच्या काळात नाशिकमध्ये करण्यात आली होती. पावसामुळे आलेली थंडीची लाट नंतर कमी होईल अशी अपेक्षा असताना, थंडीची तीव्रता कायम राहिली. पाऊस थांबल्यानंतर वाढलेल्या आर्द्रतेचा फटका नाशिककरांना बसला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण शहरच रात्रीपासून धुक्यात हरवून जात होते. सकाळच्या सुमारास बाहेर पडलेल्या नागरिकांना धुक्यातून वाट काढीत मार्गक्रमण करावे लागत होते. यासाठी वाहनांचे लाईटही सुरूच ठेवावे लागत होते. या धुक्यामुळे थेट जमिनीवर सूर्यप्रकाश येण्यासही अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सकाळी १० वाजेपर्यंत धुके दाटलेले असायचे. त्या धुक्यातून प्रवास करताना त्यातील दवबिंदूंचा स्पर्श शरीराला व्हायचा. रविवारपर्यंत धुक्याचे वलय कायम होते. सोमवारपासून मात्र त्यात बदल होऊ लागला. सोमवारच्या सकाळी धुक्याचे प्रमाण कमी झाल्याने थंडीची तीव्रताही कमी झाली. परिणामी सूर्यकिरणे थेट जमिनीवर पोहोचू लागल्याने गारवाही कमी झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास थंडी कमी झाल्याने शहराची थंडीतून सुटका झाली. आगामी काही दिवस तपमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असले, तरी स्वच्छ वातावरणामुळे थंडी वाढण्याची शक्यता नसल्याचे वेधशाळेने कळविले आहे.