अरुंद रस्ता, समोरुन वाहन आले आणि प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत, तिघांचा मृत्यू; व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 14:06 IST2026-02-03T14:05:10+5:302026-02-03T14:06:58+5:30

प्रवाशांना घेऊन जात असलेली एक बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 

Narrow road, vehicle came from the opposite direction and bus full of passengers fell straight into the valley, three died; Video surfaced | अरुंद रस्ता, समोरुन वाहन आले आणि प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत, तिघांचा मृत्यू; व्हिडीओ आला समोर

अरुंद रस्ता, समोरुन वाहन आले आणि प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत, तिघांचा मृत्यू; व्हिडीओ आला समोर

अरुंद रस्ता बाजूला खोल दरी. त्यातच समोरून वाहन आले आणि त्याला वाट देण्यासाठी चालकाने बस थोडी बाजूला घेतली. पण, दबा धरून बसलेल्या काळाने संधी साधली आणि बस थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ३५ प्रवाशी जखमी झाले आहेत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमा भागात हा अपघात घडला. 

अपघातग्रस्त बस शिमल्यावरून पाँटा साहिबकडे निघाली होती. हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाची बस डेहराडून जिल्ह्यातील कुआनू-मिनाक दरम्यान दरीत कोसळली. 

माहितीनुसार, मंगळवारी सकाळी बस  शिमल्यातील चौपाल आगारातून निघाली होती. नेवा डेपोची बस पाँटा साहिबच्या दिशेने जात होती. उत्तराखंडमधील कुआनू- मीनाक दरम्यानच्या रस्त्यावरून जात असताना हा अपघात घडला. 

बस अपघातानंतरचा व्हिडीओ 

 

डोंगराळ भागातून जाणारा हा रस्ता अरूंद आहे. समोरून एक वाहन येत होते. त्याला जाण्यासाठी रस्ता देत असताना चालकाने बस थोडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण, रस्त्याच्या कडेचा भाग खचला आणि बस थेट दरीत जाऊन पडली. बस दरीत कोसळताच प्रवाशांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. 

बचाव कार्यात प्रचंड अडथळे

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दरीतून जखमींना वर काढण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. प्रवाशांना बाहेर काढण्यात अडथळे येत होते. 

स्थानिक नागरिक आणि जवानांनी दोरखंडाच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर रस्त्यावरी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

Web Title : हिमाचल में बस घाटी में गिरी: तीन की मौत, कई घायल

Web Summary : हिमाचल-उत्तराखंड सीमा क्षेत्र में एक बस दुर्घटना में तीन लोगों की मौत हो गई और कई घायल हो गए। शिमला से जा रही बस, एक संकीर्ण सड़क से फिसलकर एक गहरी घाटी में जा गिरी। दुर्गम इलाके के कारण बचाव कार्यों में काफी मुश्किलें आईं।

Web Title : Bus Falls into Valley in Himachal: Three Dead, Many Injured

Web Summary : A bus accident in the Himachal-Uttarakhand border region resulted in three fatalities and numerous injuries. The bus, en route from Shimla, veered off a narrow road while giving way to another vehicle and plunged into a deep valley. Rescue operations faced significant challenges due to the difficult terrain.