शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नारी शक्तीला अनोखा सलाम, पत्नीचे पाय पडतात दिल्लीचे मंत्री

By admin | Updated: March 23, 2015 21:27 IST

दिल्लीतील महिला व बालविकास मंत्री संदीप कुमार हे गेल्या चार वर्षांपासून प्रत्यक्ष कृतीतून नारी शक्तीला सलाम करत आहेत. संदीप कुमार हे दररोज सकाळी पत्नीचे पाया पडतात.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २३  - स्त्रीशक्ती,  स्त्रीयांचा आदर यावर मोठमोठी भाषणं ठोकून टाळ्या मिळवणारी नेतेमंडळी आपण नेहमीच बघतो. पण दिल्लीतील महिला व बालविकास मंत्री संदीप कुमार हे गेल्या चार वर्षांपासून प्रत्यक्ष कृतीतून नारी शक्तीला सलाम करत आहेत. संदीप कुमार हे दररोज सकाळी पत्नीचे पाया पडतात. पत्नीने माझ्यासाठी तिच्या स्वप्नांना तिलांजली दिली व यासाठी मी तिचे पाया पडतो असे संदीप कुमार यांचे म्हणणे आहे. 

महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दिल्लीचे महिला व बालविकास मंत्री संदीप कुमार यांनी दररोज पत्नीचे पाया पडतो अशी जाहीर कबुली दिली. विशेष म्हणजे संदीप कुमार यांचा जन्म हरियाणात झाला असून हरियाणातील पुरुषी मानसिकता सर्वश्रृत आहे. जाहीर कार्यक्रमात संदीप कुमार यांनी ही कबुली दिल्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. संदीप कुमार यांची ही कृती दिल्लीकरांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. 

संदीप कुमार व त्यांची पत्नी रितू यांचा प्रेमविवाह आहे. २०११ मध्ये संदीप व रितू विवाहबंधनात अडकले. संदीप व रितू हे एकाच महाविद्यालयात शिकत होते व तब्बल ८ वर्ष त्यांचे प्रेमसंबंध होते. आमच्या लग्नाला प्रखर विरोध होत होता पण हा विरोध झुगारुन आम्ही लग्न केले अशी आठवण रितू यांनी सांगितली. लग्नापूर्वी मी आई वडिलांचे पाया पडायचो, त्यांनी मला या जगात आणले यासाठी मी त्यांचे आभार मानायचो. पण लग्नानंतर रितूने मला मोलाची साथ दिली, माझ्यासाठी तिनेही ब-याच गोष्टींचा त्याग केला याची जाणीव मला झाली व मग मी तिचेही पाया पडू लागलो असे संदीप कुमार सांगतात. 

संदीप कुमार यांनी जाहीर कार्यक्रमात ही कबुली दिल्यावर त्यांच्यावर कौतुक होत आहे. पण दुसरीकडे त्यांना विरोधाचा सामनाही करावा लागतो. काही जण फोन करुन पुरुषांचे वर्चस्व असलेल्या समाजात मी असे विधान कसे करु शकतो असा सवाल विचारतात, तर एका नातेवाईकाने या विधानाने तू कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का दिला अशा शब्दात विरोध दर्शवला असे संदीप कुमार नमूद करतात.