कोरेगाव-भीमा हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 19:19 IST2018-01-12T19:18:28+5:302018-01-12T19:19:29+5:30

भीमा- कोरेगाव घटनेवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भीमा कोरेगाव सारख्या घटना होवू देवू नका, असा आदेश त्यांनी आज भाजप पदाधिका-यांना दिला आहे.

Narendra Modi's Talk on Koregaon-Bhima violence | कोरेगाव-भीमा हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन

कोरेगाव-भीमा हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलं मौन

नवी दिल्ली :  भीमा- कोरेगाव घटनेवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भीमा कोरेगाव सारख्या घटना होवू देवू नका, असा आदेश त्यांनी आज भाजप पदाधिका-यांना दिला आहे. 

नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या  निवासस्थानी झालेल्या भाजप पदाधिका-यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी बोलत होते. भीमा कोरेगावच्या दंगलीच्या सूत्रधारांचा बिमोड करतानाच जातीय विद्वेष रोखण्याचे आवाहन त्यांनी केले. भीमा कोरेगाव सारख्या घटना घडवून समाजात फुट पाडणाऱ्यांना धडा शिकवा,’ असे आवाहनही त्यांनी केले.या घटना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि फूट पाडणाऱ्या असल्यातरी भाजप आणि संघ कसलीही अप्रिय घटना घडू देणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भीमा कोरेगाव जवळील सणसवाडी गावात दोन गटांमध्ये झालेल्या वादात गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं.
सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.

सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. 
दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले.

Web Title: Narendra Modi's Talk on Koregaon-Bhima violence