जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 01:44 PM2018-01-02T13:44:57+5:302018-01-02T13:47:11+5:30

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले.

Know what is the Bhima-Koregaon episode? | जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

googlenewsNext

पुणे-  पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं.
सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.

सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. 
दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले.

अकोल्यात तीव्र पडसाद
दगडफेकीच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला.अकोला शहरात काही युवकांनी सातव चौक, जठारपेठ, राऊतवाडी, लहान उमरी, रतनलाल प्लॉट चौक, केडीया प्लॉट, नवीन कपडा बाजार परिसरातून मोर्चा काढला व बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर आकोट व लोहारा येथे काही युवकांनी बसची तोडफोड केली. दरम्यान, सर्व ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे.

मुंबईतही हिंसक पडसाद
भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत. कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशन रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
 

Web Title: Know what is the Bhima-Koregaon episode?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.