शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

नरेंद्र मोदींचे वर्तन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे, अरविंद केजरीवाल यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 3:50 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. असा आरोप केजरीवाल यांनी केला.  

ठळक मुद्देदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांप्रमाणे वागतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज राजधानी नवी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण केले.

नवी दिल्ली  - आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज राजधानी नवी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण केले. यावेळी नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांचे अनेक नेते पोहेचले. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांप्रमाणे वागतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला.  केजरीवाल म्हणाले, ''जेव्हा  कुणी एका राज्याचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा तो केवळा एका पक्षाचा मुख्यमंत्री नसतो तर तो संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा पंतप्रधान बनता तेव्हा तुम्ही कुठल्या पक्षाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असता. मात्र ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देतात त्यावरून ते भारतातचे नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान वाटतात. 

 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. काही ठिकाणी त्यांच्याविरोधात मोठे बॅनरही लावण्यात आले होते. आज चंद्राबाबू नायडू यांनी पुकारलेल्या उपोषणाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, शरद यादव यांनी पाठिंबा दिला होता.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण