Narendra Modi will again in power if elections are held today, but BJP will be in shock in Maharashtra | आज निवडणुका झाल्यास देशात मोदींचीच सत्ता, पण महाराष्ट्रात भाजपाला बसणार धक्का

आज निवडणुका झाल्यास देशात मोदींचीच सत्ता, पण महाराष्ट्रात भाजपाला बसणार धक्का

नवी दिल्ली - 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्वबळावर 300 हून अधिक जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती.  गेल्या वर्षभरात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक निर्णघ घेतले असून, त्या निर्णयांबाबत उलटसुटल प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारख्या कायद्यावरून देशात असंतोष असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज एबीपी आणि सी-व्होटरच्या सर्व्हेने वर्तवला आहे. तर महाराष्ट्रात मात्र भाजपाला धक्का बसणार आहे. 

आजच्या घडीचा देशातील कल जाणून घेण्यासाठी एबीपी-सीव्होटरने लोकसभेच्या 543 मतदारसंघातील 30  हजार 240 लोकांशी चर्चा करून माहिती घेतली आहे. या सर्व्हेनुसार आज निवडणूक झाली तर मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला 330 जागा मिळतील. 2019 च्या तुलनेत आज निवडणूक झाल्यास एनडीएला 23 जागांचे नुकसान होणार आहे.  तर यूपीएला 130 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. 2019 च्या तुलनेत यूपीएला 34 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर इतर पक्षांना 83 जागा मिळणार आहेत. 

Mann Ki Baat: हिंसा कुठल्याही समस्येवरचा उपाय नाही - नरेंद्र मोदी
Republic Day 2020: प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडली ४८ वर्षाची 'ही' परंपरा
अर्थसंकल्पाआधी मोदी सरकारसाठी आणखी एक वाईट बातमी; देशाची चिंता वाढणार

या सर्व्हेमधून मोदी सरकारच्या कामगिरीविषयी विचारणा केली असता सुमारे 56 टक्के लोकांनी मोदींच्या कामगिरीवर खूप समाधानी असल्याचे सांगितले. तर 24 टक्के लोकांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. 20 टक्के लोकांनी मात्र मोदी सरकारच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचे मत नोंदवले. देशात मोदींचीच हवा असली तरी  महाराष्ट्रात मात्र वेगळे चित्र दिसत आहे.  राज्यात अस्तिवात आलेल्या महाविकास आघाडीचा फटका भाजपाला बसणार आहे. त्यामुळे आज निवडणूक झाल्यासा भाजपाला केवळ 21 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना मिळून 27 जागा मिळतील. 

आज निवडणूक झाल्यास कुणाला किती जागा मिळतील? 
एनडीए - 330 जागा
यूपीए - 130
इतर पक्ष 83  

गेल्या काही काळात विविध राज्यांमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता देशात कायम आहे. देशातील बहुतांश लोकांची पंतप्रधानपदासाठी अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती असल्याचे सर्व्हेमधून समोर आले आहे. या सर्व्हेनुसार सुमारे 70 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दिली आहे. तर 25 टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. तर 5 टक्के मतदारांनी दोघांपैकी एकालाही पसंती दिलेली नाही.  

Web Title: Narendra Modi will again in power if elections are held today, but BJP will be in shock in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.