शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मुद्द्यावर विरोधक फसणार? सरकार महिनाभर आधीच रब्बीच्या एमएसपीची घोषणा करणार

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 21, 2020 13:37 IST

आता विरोधकांना कुठल्याही प्रकारची संधी देण्याची सरकारची इच्छा नाही. त्यामुळे सरकार पुढील आठवड्यातच रब्बी पिकांसाठी अधिक एमएसपीची घोषणा करणार आहे.

ठळक मुद्दे आता विरोधकांना कुठल्याही प्रकारची संधी देण्याची सरकारची इच्छा नाही. सरकार पुढील आठवड्यातच रब्बी पिकांसाठी अधिक एमएसपीची घोषणा करणार आहे.विरोधकांचे आरोप खोटे ठरावे, यासाठी सरकार निश्चित वेळेच्या जवळपास एक महिना आधीच एमएसपीची घोषणा करणार आहे.

नवी दिल्‍ली - कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची जबाबदारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. किमान आधारभूत किंमत (MSP) बंद होणार नाही, असे मोदींनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मात्र, आता विरोधकांना कुठल्याही प्रकारची संधी देण्याची सरकारची इच्छा नाही. त्यामुळे सरकार पुढील आठवड्यातच रब्बी पिकांसाठी अधिक एमएसपीची घोषणा करणार आहे. महत्वाचे म्हणजे, विरोधकांचे आरोप खोटे ठरावे, यासाठी सरकार निश्चित वेळेच्या जवळपास एक महिना आधीच एमएसपीची घोषणा करणार आहे.

केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य

सरकारची मोठी खेळी -कृषी मंत्रालय सर्वसाधारणपमे रब्बी पिकांच्या पेरणी हंगामात एमएसपीची घोषणा करत असते. मात्र, ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात होणारी ही घोषणा यावेळी सरकार सप्टेंबर महिन्यातच करणार आहे. हा विरोधकांचे हल्ले फेल करण्याचाही एक प्रयत्न असू शकतो. गत वर्षी सरकारने 23 ऑक्‍टोबरला रब्बी पिकांसाठी एमएसपीची घोषणा केली होती. मात्र, यावेळी लागवडीपूर्वीच एमएसपी घोषित होत असल्याने, कोणत्या पिकाची पेरणी करायला हवी, हेदेखील शेतकऱ्यांना ठरवता येईल. जाहीर होणाऱ्या नव्या एमएसपीवर पुढील वर्षी 1 एप्रिलपासून रब्बी पिकांच्या खरेदीला सुरुवात होईल.

यावर्षी रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 1.13 लाख रुपये -एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'रब्बी हंगामातील पिकांच्या एमएसपीमध्ये 2018-19च्या अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे, राष्ट्रीय स्तरावर पिकासाठी लागणाऱ्या सरासरी खर्चाच्या किमात दीडपट वाढ करण्यात येईल.' कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले, रब्बी पिकांसाठी 2020मध्ये शेतकऱ्यांना 1.13 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत 31% अधिक आहे. याशिवाय कृषी मंत्रालयाने विरोधकांनी संसदेत उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

मोदींची आक्रमक भूमिका -राज्‍यसभेत कृषी क्षेत्राशीसंबंधित दोन विधेयके मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केलेले ट्विट त्यांच्या आक्रमकतेची ग्वाही देणारे आहेत. मोदींनी म्हटले आहे, हा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. मी आधीही सांगितले आहे आणि पून्हा सांगतो, की एमएसपी आणि सरकारी खरेदी व्‍यवस्‍था सुरूच राहणार आहे. 

आता शेतकऱ्यांना दलालांचा समना करावा लागणार नाही -"अनेक दशकांपासून आपले शेतकरी बांधव, अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना दलालांचा समना करावा लागत होता. आता ही विधेयके संसदेत मंजूर झाल्याने, या सर्वांतून शेतकऱ्यांची मुक्तता झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल आणि त्यांची समृद्धी निश्चित होईल," असेही मोदींनी म्हटले आहे.

आता WHO प्राचीन औषधांमध्ये शोधणार कोरोनाचा इलाज! हर्बल मेडिसिनच्या ट्रायलचे केले समर्थन

आधुनिक तंत्रज्ञानाची तत्काळ आवश्यकता -मोदी म्हणाले, “कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची तत्काळ आवश्यकता आहे. यामुळे मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. ही विधेयके मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंत पोहोचणे सहज सोपे होईल. यातून केवळ उत्पादनच वाढणार नाही. तर इतरही चांगले परिणाम दिसून येणार आहेत, असेही मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस