शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

आम्ही कुणाला छेडत नाही आणि छेडणाऱ्याला सोडतही नाही - नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 4:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत आयोजित एनसीसी रॅलीमध्ये गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत आयोजित एनसीसी रॅलीमध्ये गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले मोदींनी नामोल्लेख न करता पाकिस्तानला इशारा दिलाआम्ही मुद्दामहून कुणाच्या वाटेला जात नाही, पण कुणी आम्हाला छेडले तर त्याला सोडतही नाही, असाच संदेश लष्कराने दिला आहे

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत आयोजित एनसीसी रॅलीमध्ये गार्ड ऑफ ऑनरचे निरीक्षण केले. त्यानंतर उपस्थित एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना मोदी म्हणले, ''मी तुम्हाला संबोधित करण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा माझ्या मनात भूतकाळातील आठवती ताजा होतात. हा दिवस जो आज तुम्ही अनुभवत आहात, तेच क्षण मलाही अनुभवता आले होते.'' यावेळी मोदींनी नामोल्लेख न करता पाकिस्तानला इशारा दिला. आपल्या लष्करानेही आता शत्रूंना स्पष्ट संदेश दिलेला आहे. आम्ही मुद्दामहून कुणाच्या वाटेला जात नाही, पण कुणी आम्हाला छेडले तर त्याला सोडतही नाही, असाच संदेश लष्कराने दिला आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले.  मोदींनी संबोधनादरम्यान सांगितले की, आपल्या लष्कराने स्पष्ट संदेश दिला आहे. आम्ही कुणाला मुद्दामहून छेडत नाही आणि कुणी आम्हाला छेडले तर त्याला सोडतही नाही. आम्ही शांततेचे कट्टर पुरस्कर्ते आहोत. पण देशाच्या रक्षणासाठी कुठलेही पाऊल उचलण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. म्हणूनच गेल्या चार वर्षांच रक्षण आणि संरक्षणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.'' ''आजच्या घडीला भारत हा जगातील त्या मोजक्या देशांपैकी एक देश आहे ज्याच्याकडे जमीन, आकाश आणि पाण्यामधून मारा करता येण्यास सक्षम असलेली अण्वस्त्रे आहेत. तसेच अनेक दशकांपासून खोळंबलेले विमान आणि आधुनिक तोफांसंबंधीचे करार  प्रत्यक्षात आणले गेले आहेत. देशामध्येही क्षेपणास्रापासून टँक, दारुगोळा आणि हेलिकॉप्टर बनवले जात आहेत. येत्या काळातही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेल असा प्रत्येक मोठा आणि कठोर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मी येथे उपस्थित असलेल्या माझ्या युवा सहकाऱ्यांना देतो,'' असेही मोदींनी यावेळी सांगितले. 

   यावेळी एनसीसी कॅडेट्सच्या कार्याची मोदींनी प्रशंसाही केली, ''तुम्ही येथे देशातील विविध भागातून आला आहात. मला तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांची जाणीव आहे. हेच परिश्रम आपल्याला सक्षम बनवतील,'' असे मोदींनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतNew Delhiनवी दिल्लीIndian Armyभारतीय जवान