माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:53 IST2025-10-07T18:52:54+5:302025-10-07T18:53:36+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर एक अजब तक्रार आली आहे. माझी पत्नी नागीण बनली आहे. त्यामुळे भीतीने मी रात्रीच्या वेळी झोपू शकत नाही, माझी पत्नी मला दंश करेल अशी भीती वाटते, अशी तक्रार एका व्यक्तीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे केली.

माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय
उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर एक अजब तक्रार आली आहे. माझी पत्नी नागीण बनली आहे. त्यामुळे भीतीने मी रात्रीच्या वेळी झोपू शकत नाही, माझी पत्नी मला दंश करेल अशी भीती वाटते, अशी तक्रार एका व्यक्तीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे केली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार महमूदाबाद तालुक्यातील लोधासा गावातील मेराज नावाच्या तक्रारदाराने ४ ऑक्टोबर रोजी आयोजित एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिषेक आनंद यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. त्याने सांगितले की, माझी पत्नी नसीमुन मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे. तसेच रात्री ती नागिणीप्रमाणे फुत्कारते आणि मला घाबरवते. मी वारंवार विनंती केल्यानंतरही स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे आज मला मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव घ्यावी लागली आहे.
दरम्यान, या तरुणाची तक्रार ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारीही अवाक् झाले. त्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. याबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला याबाबत तक्रार मिळाली आहे. तक्रारीमध्ये एखा व्यक्तीने त्याची पत्नी रात्री नागीन बनते आणि आपल्यावर फुत्कार सोडते, असे सांगितले, ही व्यक्ती घाबरलेली आहे. आम्ही याबाबत अधिक तपास करत आहोत.