शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माझा मुलगा निरपराध; मेहदीच्या पित्याची ग्वाही

By admin | Updated: December 14, 2014 01:33 IST

मेहदी मसरूर बिस्वास याला पोलिसांनी अटक केल्याची आपल्याला माहिती नाही आणि आपल्या मुलाचे इंटरनेट अकाऊंट हॅक करण्यात आले होते, असे मेहदीचे पिता एम. बिस्वास यांनी म्हटले आहे.

अटकेची माहिती नाही : अकाउंट हॅक झाले 
कोलकाता : मेहदी मसरूर बिस्वास याला पोलिसांनी अटक केल्याची आपल्याला माहिती नाही आणि आपल्या मुलाचे इंटरनेट अकाऊंट हॅक करण्यात आले होते, असे मेहदीचे पिता एम. बिस्वास यांनी म्हटले आहे.
‘त्याला अटक झाल्याची आपल्याला माहिती नाही. त्याचा फोन बंद आहे. त्यामुळे आम्ही बेंगळुरूला जाण्याचे ठरविले आहे. पोलिसांनीही आमच्याशी संपर्क साधला नाही. आपल्या मुलाचा इसिसशी काही संबंध असेल यावर आपला विश्वास नाही. काल रात्री एका पत्रकाराने मला हे सांगितले. तेव्हा मी त्याला फोन करून याबाबत विचारले. हे सर्व कसे घडले हे आपल्याला माहीत नसल्याचे आणि आपले इंटरनेट अकाऊंट हॅक करण्यात आल्याचे त्याने मला सांगितले’, असे एम. बिस्वास म्हणाले. 
आपल्याकडे ‘चॅनल 4’चे काही लोक आले होते, असे मेहदी म्हणाला होता, अशी माहिती एम. बिस्वास यांनी यावेळी दिली.
मेहदीचे पालक पश्चिम बंगालमध्ये राहतात. त्याला दोन बहिणी आहेत. त्याचे वडील राज्य विद्युत मंडळातील निवृत्त कर्मचारी आहेत. त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून ‘चॅनल 4’ने त्याचे पूर्ण नाव जाहीर केले नव्हते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मेहदीने टि¦टर अकाऊंट  बंद केले होते. मेहदीचे हे टि¦टर अकाऊंट इस्लामिक स्टेटचे सर्वात प्रभावशाली टि¦टर अकाऊंट बनले होते. (वृत्तसंस्था)
 
 
 
बेकायदा कारवायांचा गुन्हा 
4मेहदी बिस्वासविरुद्ध युद्ध पुकारणो आणि बेकायदेशीर कारवाया केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेहदी हा आपला कर्मचारी असल्याचे आयटीसी लिमिटेडच्या कार्पोरेट कम्युनिकेशन्सने मान्य केले आहे.  
 
पथक बेंगळुरुत 
4नवी दिल्ली :  मेहदीला अटक झाल्यानंतर ‘इसिस’च्या भारतातील कारवायांचा तपास करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) एक पथक शनिवारी बेंगळुरुला रवाना झाले.  बर्दवान स्फोटात सहभाग असलेल्या जमात-उल-मुजाहिदीन, बांगला देश (जेएमबी) या दहशतवादी संघटशी मेहदीचा संबंध असल्याचा एनआयएचा संशय आहे., असे गृहमंत्रलयाच्या अधिका:याने सांगितले.