मंदिराजवळ मासेमारी करणाऱ्या मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 09:29 IST2018-09-26T09:27:53+5:302018-09-26T09:29:03+5:30

गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

muslim Man Lynched for Fishing Near Temple in Rajasthan | मंदिराजवळ मासेमारी करणाऱ्या मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या

मंदिराजवळ मासेमारी करणाऱ्या मुस्लिम तरुणाची जमावाकडून हत्या

उदयपूर: राजस्थानमधील चित्तौडगढमध्ये जमावानं एका मुस्लिम व्यक्तीची हत्या केली आहे. एका मंदिराजवळ ही घटना घडली. हत्या करण्यात आलेला तरुण त्यावेळी मासेमारी करत होता. जमावानं तरुणाला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मुस्लिम तरुण मंदिराजवळ मासेमारी करत असल्यानं जमावानं त्याच्यावर हल्ला केला. या तरुणाचं नाव अजहर खान असं आहे. अजहर खेरी गावातील रुपारेल नदीच्या किनाऱ्यावर मासेमारी करत होता. यावेळी त्याच्यासोबत आणखी तिघेजण होता. मंदिराजवळ मासेमारी करत असल्यानं जमावानं अजहर खानला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावानं मारहाण करताच अजहरसोबत असलेल्या तिघांनी तिथून पळ काढला. यानंतर ग्रामस्थांनी अजहरला बांबूच्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. 

जमावाच्या बेदम मारहाणीत अजहर खान गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला उदयपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
 

Web Title: muslim Man Lynched for Fishing Near Temple in Rajasthan