शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:44 IST

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

गर्भवती पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. कर्नाटकची राजधानी बंगळुरुतील एका निवासी भागात ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.  या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी शिवम हा मूळचा उत्तर प्रदेशातील कुशीनगरचा रहिवासी असून तो पेंटर आहे. त्याची पत्नी सुमना तीन महिन्यांची गर्भवती होती. दोघांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केले होते. दोघेही गेल्या पाच महिन्यांपासून बेंगळुरूमध्ये राहत होते. बुधवारी दुपारी शिवमच्या शेजाऱ्यांनी त्याच्या घरातून उग्र वास येत असल्याची पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना घरात सुमनाचा मृतदेह कुजलेला अवस्थेत आढळला. सुमनाच्या शरिरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. परंतु, तिच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. मृतदेहजवळ पोलिसांना दारूची बाटली आणि अन्न आढळून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शिवम आणि सुमनाचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी सहा महिन्यांपूर्वी एकमेकांशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर त्यांच्यात शुल्लक कारणांवरून वारंवार भांडणे होऊ लागली. दरम्यान, सोमवारी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी शिवमने सुमनाला बेदम मारहाण केली.  भांडणानंतर दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन झोपले. सोमवारी शिवमने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्याने स्वत:च्या हाताने जेवण बनवून खाल्ले आणि कामावर गेला. कामावरून आल्यानंतर तो दारू प्यायला आणि जेवण करून झोपला. परंतु, बुधवारी सकाळी त्याने पु्न्हा सुमनाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हाही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर शिवम तिच्याजवळ गेला असता सुमना मृतावस्थेत आढळली. 

सुमनाचा मृत्यू झाल्याचे कळताच शिवम घरातून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन गुरुवारी सकाळी त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत्युचे नेमेक कारण जाणून घेण्यासाठी सुमनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूर