शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 17:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. 

ठळक मुद्देमुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडलीदुर्घटनेत चौघांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. 

मुंबई : मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी (16 जुलै) घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. 

'डोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत. जखमी झालेले लोक लवकर बरे होतील अशी मला आशा आहे. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदत आणि बचावकार्य करत आहे' असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली आहे. 

साबिया निसार शेख (25), अब्दुल सत्तार कालू शेख (55), मुझ्झमील सलमानी (15), सायरा शेख (25) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत. तर फिरोज नाझिर सलमानी (45), आयशा शेख (3), सलमा शेख (55), अब्दुल रहमान (3), नावेद सलमानी (35), इम्रान हुसेन कल्वानिया (30), जावेद (30) आणि झिनत (30) अशी जखमींची नावं आहेत.

दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असताना एका चिमुकल्याला बाहेर काढण्यात आलं. चार मजली इमारतीचा भाग कोसळूनदेखील चिमुकला सुरक्षित असल्यानं उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केलं. दुर्घटनास्थळी अद्यापही अनेकजण अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. कोसळलेली इमारत 100 वर्षे जुनी असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. या इमारतीत 8 ते 10 कुटुंब वास्तव्यास होती. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी या दुर्घटनेचा सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "डोंगरी भागातील दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत पुनर्विकास यादीत होती मात्र त्यावर निर्णय घेतला गेला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात इमारत पुनर्विकासाबाबतची एक बैठकही घेतली नाही. पुनर्विकासाच्या इमारतींबाबत सरकारचे धोरण हे उदासीन आहे. पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी किती बैठका घेतल्या? राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच अशा इमारत दुर्घटना होत आहेत. राज्य सरकारचे पुनर्विकासाचे उदासीन धोरण, म्हाडा आणि मुंबई  महापालिका दुर्घटनेला जबाबदार आहे."  

डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत 100 वर्षे जुनी होती, धोकादायक इमारतीच्या यादीत या इमारतीचा समावेश नव्हता. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे दिली होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करु अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  

मुंबईतील दुर्घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, दुर्घटनाग्रस्त झालेली इमारत ही सुमारे 100 वर्षे जुनी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. म्हाडाच्या अखत्यारीत असलेली ही इमारत स्थानिक रहिवाशांनी पुर्नविकासासाठी बिल्डरला दिली होती. मात्र या इमारतीचा तत्काळ खाली करण्यात येणाऱ्या धोकादायक इमारतींमध्ये समावेश नव्हता. आता या इमारतीच्या दुरुस्तीचे काम बिल्डरने तातडीने सुरू केले होते की नाही याची चौकशी करण्यात येईल. मात्र सध्यातरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम प्राथमिकतेने करण्यात येईल.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यूMumbaiमुंबईBuilding Collapseइमारत दुर्घटना