शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

Reliance कडून दररोज १ हजार टन ऑक्सिजनचं उत्पादन; मुकेश अंबानीही स्वत: लक्ष ठेवून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 4:40 PM

Coronavirus Oxygen crisis : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजनही मोफत ऑक्सिजन पुरवण्यास घेतलाय पुढाकार

ठळक मुद्देमुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजनही मोफत ऑक्सिजन पुरवण्यास घेतलाय पुढाकारमुकेश अंबानी स्वत: या पुरवठ्यावर लक्ष ठेवून असल्याची कंपनीची माहिती

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडत आहेत. ऑक्सिजन, औषधांचीही सध्या मोठ्या प्रमाणात भासत आहे. सरकारव्यतिरिक्त इतर संस्था ऑक्सिजनचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं दररोज सुमारे एक हजार टन मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादन सुरू केलं आहे.कंपनीने वैद्यकीय ऑक्सिजनचं उत्पादन ० ते १ हजार टनपर्यंत वाढवलं आहे. जे देशातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या उत्पादनाच्या ११ टक्के आहे, असं कंपनीनं आपल्या निवेदनाद्वारे सांगितलं आहे. तसंच मुकेश अंबानी स्वत: गुजरातच्या जामनगरमधील कंपनीच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवून असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविणं हे माझ्यासाठी आणि संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीजचं पहिलं प्राधान्य आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले. "भारताला सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत मेडिकल ऑक्सिजनचं उत्पादन वाढवून उत्तम पुरवठा व्यवस्था स्थापन करायला हवी," असंही त्यांनी नमूद केलं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात कंपनीनं १५ हजार टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. याशिवाय कंपनीनं सौदी अरेबिया. जर्मनी, बेल्जिअम, नेदरलँड्स आणि थायलंडमधून ५०० टन ऑक्सिजन कंटेनरदेखील एअरलिफ्ट केले आहेत. त्यामुळे पुरवठ्यातही वाढ झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीIndiaभारत