मिस्टर इंडिया मैदान सोडून गेले - संघाचा राहुल गांधींना चिमटा

By Admin | Updated: September 27, 2015 14:05 IST2015-09-27T14:05:07+5:302015-09-27T14:05:25+5:30

ष्ठांच्या पक्षातील तरुण 'मिस्टर इंडिया' नेहमीप्रमाणे कोणताही सुगावा न लागू देता निवडणुकीच्या मैदानातून गायब झाले आहेत अशा शब्दात संघाने राहुल गांधींना चिमटा काढला आहे.

Mr. India leaves the field - Team Rahul's tweezers to Rahul Gandhi | मिस्टर इंडिया मैदान सोडून गेले - संघाचा राहुल गांधींना चिमटा

मिस्टर इंडिया मैदान सोडून गेले - संघाचा राहुल गांधींना चिमटा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - ज्येष्ठांच्या पक्षातील तरुण 'मिस्टर इंडिया' नेहमीप्रमाणे कोणताही सुगावा न लागू देता निवडणुकीच्या मैदानातून गायब झाले आहेत अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवस संघाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. युवराज मैदान सोडून गेल्याने पक्षाची जबाबदारी पुन्हा एकदा ज्येष्ठांच्या खांद्यावर आल्याचा चिमटाही संघाने काढला आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पांचजन्यच्या संपादकीयमधून रविवारी राहुल गांधींवर बिहार निवडणुकीवरुन जोरदार टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या अमेरिकेत असून यावरुन संपादकीयमध्ये भाष्य करण्यात आले आहे. 'धोती व सुटवरुन वारंवार विधान करणारे युवराज आता परतले आहेत. बिहारमध्ये फक्त ४१ जागांवर लढणारा सर्वात जुना पक्षाची ही ऐतिहासिक नाचक्की आहे' असे यात म्हटले आहे. रणसंग्रामापूर्वी मैदातान उडालेल्या धुळीमुळे युवराज थकले आहेत असा चिमटाही या लेखात काढण्यात आला आहे. अनिल कपूर यांचा मिस्टर इंडिया चित्रपट गाजला होता. या चित्रपटातील नायक अदृश्य व्हायचा. त्याच धर्तीवर संघाने राहुल गांधीना 'मिस्टर इंडिया' असे संबोधित केल्याने आता काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरही संघाच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे. 

 

Web Title: Mr. India leaves the field - Team Rahul's tweezers to Rahul Gandhi