दारू सर्व काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरचा 'आप'ला खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:39 IST2023-10-04T19:38:46+5:302023-10-04T19:39:15+5:30
'आप'चे खासदार खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

दारू सर्व काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरचा 'आप'ला खोचक टोला
AAP MP Sanjay Singh : खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 'आप'चेखासदार खासदार संजय सिंह यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. संजय सिंह यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकाने सकाळी छापा मारला असून, दिल्लीस्थित त्यांच्या निवासस्थानी तपासणी सुरू केली होती. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी ईडीचं पथक सकाळी सात वाजता संजय सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचलं होतं. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तीन ठिकाणी संजय सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे. यानंतर आता ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. यावरून भाजपा खासदार गौतम गंभीरने 'आप'ला खोचक टोला लगावला आहे.
गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "दारू सर्व काही काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य, तर मग 'आप'चे नुकसान का करणार नाही?." संजय सिंह यांच्या अटकेनंतर दिल्लीतील सत्ताधारी 'आप' आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपा हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. २०२४ च्या निवडणुका येत आहेत. त्यांना (भाजपा) माहीत आहे की, ते हरणार आहेत आणि हे त्यांचे हताश प्रयत्न आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी ईडी आणि सीबीआयसारख्या सर्व एजन्सी सक्रिय होतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले होते.
शराब सब का नाश करती है चाहे सेहत हो या चरित्र, “आप”का क्यों नहीं करेगी? #LiqourScam
— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 4, 2023
दरम्यान, संजय सिंह यांच्या अटकेची बातमी समजताच आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी जमा झाले. संजय सिंह यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. आज रात्री तो ईडी लॉकअपमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना गुरुवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी सकाळी 'आप'चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. या प्रकरणी आणखी काही लोकांच्या जागेवरही छापे टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.