MP Minister Prem Singh Patel controversial comment on corona deaths  | 'वय झालं की मरावच लागतं'! कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंवर MPच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

'वय झालं की मरावच लागतं'! कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंवर MPच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

ठळक मुद्देकोरोनाने मध्य प्रदेशातही थैमान घातले आहे. येथील कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे.कोरोना मृत्यूंवर शिवराज सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला.

भोपाळ - कोरोनाने मध्य प्रदेशातही थैमान घातले आहे. येथील कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. एकीकडे रोजच्या रोज हजारो करोनाबाधित समोर येत असतानाच दुसरीकडे शेकडोच्या संख्येने मृत्यूही होत आहेत. मात्र, या मृत्यूंवर शिवराज सरकारमधील मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोकांचे वय झाले, की मरावेच लागते, असे पशुपालन मंत्री प्रेम सिंह पटेल यांनी म्हटले आहे.  (MP Minister Prem Singh Patel controversial comment on corona deaths)

CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...

प्रेम सिंह यांना मध्य प्रदेशात कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, की मृत्यू झाले आहेत, ते कुणीही थांबू शकत नाही. डॉक्‍टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांनी डॉक्टरांकडे जायला हवे. मृत्यूंच्याच बाबतीत सांगायचे, तर लोकांना आपले वय पूर्ण झाले, की मरावेच लागते.

जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर 41 मृतांवर अंत्यसंस्कार -
मध्येप्रदेशातील रुग्णालयांतून भयावह दृष्य समोर येत असतानाच प्रेम सिंह यांचे हे वक्तव्य आले आहे. एवढेच नाही, तर शिवराज सरकार कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचे आकडे लपवत असल्याचा आरोपह विरोधक करत आहेत. जबलपूर येथील चौहानी स्मशानभूमीवर बुधवारी तब्बल 41 मृतांवर अंतिमसंस्कार करण्यात आला. मात्र, शहरात केवळ पाचच मृत्यू झाल्याचा दावा राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनने केला आहे.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

भोपाळ आणि इंदूर येथील स्मशानभूमीतही, अशीच स्थिती बघायला मिळाली. येथे लोकांना आपल्या नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी अक्षरशः वाट बघावी लागली.

24 तासांत 9 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण - 
मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 9 हजार हून अधिक कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर कोरोनामुळे 51 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. राज्यात आतापर्यंत 3 लाख 63 हजारहून अधिक लोकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर -
महाराष्ट्र, दिल्ली पाठोपाठ आता गुजरातमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक स्मशानांबाहेर मृतांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अहमदाबाद, सूरत सारख्या प्रमुख शहरांमधील परिस्थिती गंभीर आहे. हिंदू धर्मात साधारणपणे सूर्योदयानंतर अंत्यविधी करत नाहीत. मात्र कोरोना मृतांचा आकडा वाढतच असल्यानं अनेक ठिकाणी रात्रीदेखील अंत्यस्कार सुरू आहेत. 

एकाचवेळी 25 जणांना अग्नी -
सूरत शहरातल्या उमरा भागात एका स्मशानात दोन दिवसांपूर्वी एकाचवेळी 25 जणांना अग्नी देण्यात आला. रात्रीच्या सुमारास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बडोद्यातही रात्रीच्या वेळी मृतदेहांवर अंत्यविधी होत आहेत. गुजरातच्या प्रमुख शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि मृतांच्या नातेवाईकांना फार वेळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी अधिकाऱ्यांनी लोखंडाच्या चिता तयार केल्या आहेत.
 

English summary :
MP Minister Prem Singh Patel controversial comment on corona deaths 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MP Minister Prem Singh Patel controversial comment on corona deaths 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.