सासऱ्याने तलवारीने कापले होते सूनेचे दोन्ही हात, ९ तासात डॉक्टरांनी पुन्हा जोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 05:49 PM2021-11-18T17:49:34+5:302021-11-18T17:50:31+5:30

Madhya Pradesh : सहा डॉक्टरांच्या टीमने ९ तासांच्या सर्जरीनंतर महिलेचे दोन्ही हात मनगटापासून जोडले. आता महिला बरी होत आहे.

MP : Father in law sword cut hand wrist bone broken 9 hours surgery blood vessel bhopal | सासऱ्याने तलवारीने कापले होते सूनेचे दोन्ही हात, ९ तासात डॉक्टरांनी पुन्हा जोडले

सासऱ्याने तलवारीने कापले होते सूनेचे दोन्ही हात, ९ तासात डॉक्टरांनी पुन्हा जोडले

Next

मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळच्या (Bhopal) नर्मदा हॉस्पिटलच्या (Narmada Hospital) डॉक्टरांनी एक अशक्य दिसणारं काम शक्य करून दाखवलं आहे. नर्मदा हॉस्पिटलमध्ये एका महिलेला दोन्ही हात कापलेल्या स्थितीत दाखल करण्यात आलं होतं. इथे सहा डॉक्टरांच्या टीमने ९ तासांच्या सर्जरीनंतर महिलेचे दोन्ही हात मनगटापासून जोडले. आता महिला बरी होत आहे. या अवघड सर्जरीनंतर ड़ॉक्टरांची टीमही फार आनंदी आहे.

डॉक्टरांनी महिलेचे तोडलेले दोन्ही हात जोडले

११ नोव्हेंबरला विदिशामध्ये राहणाऱ्या एका महिला गंभीर स्थितीत भोपाळच्या नर्मदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. महिलेच्या सासऱ्याने तिच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला होता. तलवारीापासून स्वत:ला वाचवतेवेळी महिलेच्या दोन्ही हातावर गंभीर जखमा आल्या होत्या. दोन्ही हातांच्या रक्तनलिका मनगटापासून कापल्या गेल्या होत्या आणि हाडंही तुटली होती. सोबतच महिलेच्या चेहऱ्यावरही वार केल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. असं सांगितलं जात आहे की, महिलेचा हात जवळपास तुटून लटकलेला होता.

ऑपरेशन थिएटरमध्ये स्पाइन सर्जन डॉक्टर राजेश शर्मा, क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉक्टर रेणु शर्मा यांच्या नेतृत्वात महिलेच्या हातावर सर्जरी करण्यात आली. साधारण ८ ते ९ तास चाललेल्या या सर्जरीत महिलेचा तुटून लटकलेला हात जोडण्यात आला. 

डॉक्टरांनी सांगितलं की, मनगटात रक्त पोहोचवणाऱ्या बारीक नसांचं फार नुकसान झालं होतं. त्यामुळे प्लास्टिक सर्जनने आमच्या टीमसोबत मिळून महिलेची सर्जरी केली, जी ८ ते ९ तासांपर्यंत चालली. तिचे दोन्ही हात वाचवण्यात आम्हाला यश आलं. हे ऑपरेशन सफल करण्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर विशाल रामपुरी, एनेस्थिसिया तज्ज्ञ प्रशांत यशवंते, फिजिशिअन डॉक्टर  गोपाल बाटनी हेही होते.
 

Read in English

Web Title: MP : Father in law sword cut hand wrist bone broken 9 hours surgery blood vessel bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app