शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

मेरी कोमवरील चित्रपट मणिपूरमध्येच झळकणार नाही

By admin | Updated: August 20, 2014 16:30 IST

पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या जीवनावर आधारीत चित्रपट तिच्या राज्यात अर्थात मणिपूरमध्येच प्रदर्शित होणार नाही.

ऑनलाइन लोकमत

इंफाळ, दि. १९ - पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिंपिकमधील कांस्य पदक विजेती बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या जीवनावर आधारीत चित्रपट तिच्या राज्यात अर्थात मणिपूरमध्येच प्रदर्शित होणार नाही. मणिपूरमध्ये २००० पासून मणिपूरमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी असून मेरी कोम या चित्रपटासाठीदेखील ही बंदी शिथील करण्यात येणार नसल्याचे समजते. त्यामुळे मणिपूरी कन्येची ही यशोगाथा मणिपूरी जनतेलाच बघता येणार नाही. 
बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या यशस्वी कारकिर्दीवर संजयलीला भन्साली यांनी मेरी कोम या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियंका चोप्रा पडद्यावरील मेरी कोम साकारणार असून ओमंग कुमारने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मणिपूरमध्ये अत्यंत कठीण परिस्थितून बॉक्सिंगमध्ये प्रावीण्य मिळवणा-या मेरी कोमची ही यशोगाथा पडद्यावर  साकारली जात असल्याने याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र मेरी कोमच्या मणिपूरमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार मणिपूरमध्ये २००० सालापासून बॉलिवूडमधील हिंदी चित्रपट आणि भाषेवर बंदी टाकण्यात आली आहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे यातून मेरी कोमच्या चित्रपटालाही दिलासा देण्यात आलेला नाही. चित्रपटात मणिपूरमधील कलाकारांना घेण्यात आलेले नाही, मेरी कोम आणि प्रियंका चोप्रात कोणतेच साधर्म्य नाही यामुळेदेखील मणिपूरमधील काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.