शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा अधिवेशनात ‘तो’ दिवस सर्वात आव्हानात्मक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:23 IST

केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सादर केले तो १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनातील सगळ्यात आव्हानात्मक दिवस होता, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सादर केले तो १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनातील सगळ्यात आव्हानात्मक दिवस होता, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.तो ‘आव्हानात्मक दिवस’ कसा हाताळला, याचा तपशील सांगताना बिर्ला म्हणाले की, प्रत्येक सदस्याला अध्यक्ष पुरेसा वेळ देतील याचा सभागृहातील सदस्यांना आत्मविश्वास होता. विधेयकावरील कोणतेही मत, दृष्टिकोन, युक्तिवाद, चर्चा ऐकली जाणार नाही, असे होणार नसल्याची सदस्यांना खात्री होती. त्यामुळे सभागृहाचे कामकाज त्या दिवशी सहजपणे पार पडले.१९५२ पासून लोकसभेचे हे अधिवेशन सगळ्यात जास्त कामकाजाचे ठरले. सदस्यांनी जी बांधिलकी आणि शिस्त त्या दिवशी दाखवली त्यामुळे कामकाज सहजपणे होऊ शकले. खूप महत्त्वाच्या विषयांवर लोकांनी आपापल्या राजकीय पक्षांतील मतभेदांना बाजूला ठेवल्याची अनेक उदाहरणे आहेत. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी प्रत्येक सदस्याचे सहकार्य आवश्यक असते आणि यावेळी आम्ही ते खूपच चांगल्या प्रकारे केले आहे, हे अभिमानाने देशाला सांगू शकतो, असे बिर्ला म्हणाले.१७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या कामकाजाचा तपशील बिर्ला यांनी सांगितला. ते म्हणाले, १७ जून रोजी कामकाज सुरू झाले आणि ते २६ जुलै रोजी संपणार होते; परंतु सात आॅगस्टपर्यंत ते वाढवण्यात आले. अधिवेशनात ३७ बैठका झाल्या व एकूण २८० तास कामकाज चालले आणि ३५ विधेयके संमत झाली. कामकाज चालवण्यासाठी सभागृह सायंकाळी उशिरापर्यंत ७५ तास सुरू होते. सदस्यांनी शून्य कालावधीत एक हजार ८६ विषय उपस्थित केले व त्यातील बहुतेक सदस्य हे पहिल्यांदाच खासदार झालेले होते. पहिल्यांदाच खासदार बनलेल्या २६५ सदस्यांपैकी २२९ जणांना शून्य कालावधीत बोलण्याची संधी मिळाली. ४६ महिला खासदारांपैकी ४२ जणी याच कालावधीत बोलल्या, असे बिर्ला म्हणाले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाom birlaओम बिर्ला