शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

भारतातील या राज्यात आहेत सर्वाधिक भिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 5:18 PM

रेल्वे, बसस्टॉप आणि मंदिराच्या आवारात असणारी भिकाऱ्यांची उपस्थिती ही आपल्यासाठी नित्याचीच बाब आहे. गरिबी आणि बेरोजगारीमुळे काहीजणांना भीक मागून उदरनिर्वाह करणे भाग पडते. दरम्यान, देशातील सर्वात जास्त भिकारी...

नवी दिल्ली -  रेल्वे, बसस्टॉप आणि मंदिराच्या आवारात असणारी भिकाऱ्यांची उपस्थिती ही आपल्यासाठी नित्याचीच बाब आहे. गरिबी आणि बेरोजगारीमुळे काहीजणांना भीक मागून उदरनिर्वाह करणे भाग पडते. दरम्यान, देशातील सर्वात जास्त भिकारी पश्चिम बंगालमध्ये असल्याचे समोर आले आहे.  समाजकल्याण मंत्रालयाने लोकसभेत एका प्रश्नाल ऊत्तर देताना ही माहिती दिली आहे. समाजकल्याणमंत्री थावरचंद गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्याच्या घडीला चार लाख 13 हजार 760 भिकारी आहेत. त्यातील 2 लाख 21 हजार पुरुष तर उर्वरित महिला भिकारी आहेत. यातील सर्वाधिक भिकारी पश्चिम बंगालमध्ये आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण 81 हजार 244 भिकारी आहेत भिकाऱ्यांच्या क्रमवारीत उत्तर प्रदेश दुसऱ्या तर बिहार तिसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशात 65 हजार 835 तर बिहारमध्ये 29 हजार 723 भिकारी आहेत. महाराष्ट्रामध्ये 24 हजार 207 भिकारी आहेत.भिकाऱ्यांची संख्या विचारात घेतली तर पूर्वोत्तर राज्यांमध्ये परिस्थिती चांगली आहे. येथे इतर भागांच्या तुलनेत भिकाऱ्यांची संख्या फार कमी आहे. पूर्वोत्तर भागातील  अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ 114 भिकारी आहेत, तर नागालँडमध्ये 124, मिझोराममध्ये केवळ 53 भिकारी आहेत केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता दमण दीवमध्ये केवळ  22 तर लक्षद्वीपमध्ये केवळ दोन भिकारी आहेत. या यादीमध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या पर्वतीय राष्ट्रांमध्येही भिकाऱ्यांची संख्या कमी आहे.  उत्तराखंडमध्ये 3320 भिकारी आहेत, तर हिमाचल प्रदेशात केवळ 809 भिकारी आहेत.   

टॅग्स :Indiaभारतnewsबातम्या