शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सकाळपासून रात्रीपर्यंत... चायनिजच !

By admin | Updated: October 16, 2016 01:16 IST

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... अशा ओळी विंदा करंदीकर यांनी लिहून अजरामर करून ठेवल्यात... तशीच गत आपल्या आयुष्यात चायनिज वस्तूंची झाली आहे.

- पवन देशपांडे, मुंबई

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... अशा ओळी विंदा करंदीकर यांनी लिहून अजरामर करून ठेवल्यात... तशीच गत आपल्या आयुष्यात चायनिज वस्तूंची झाली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत रोजच्या जगण्यात चिनी वस्तूंचा भडीमार झालेला आहे. सध्या चायनिज वस्तूंवर बॅन घालण्याची चर्चा जोरदार सुरू आहे पण हे थांबवायचे कसे? आपला दिनक्रमच बघा ना... टाळू शकतो का आपण या वस्तूंचा वापर?- 20% एवढी मोठी आयातवाढ आपण एकमेव  चीनसोबतच्या व्यापरात नोंदवली आहे. गेल्या दोन वर्षांतील ही आयात आणि त्यात येणाऱ्या वस्तू आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनल्या आहेत. - 61अब्ज डॉलर किमतीच्या मालाची चीनमधून आयात करतो.

- 09अब्ज डॉलर किमतीच्या मालाची चीनमध्ये निर्यात करतो सकाळी - आपल्या घरात वाजणारा गजर अन् ती घड्याळ कोणती? मेड इन चायना!!- ब्रेकफास्ट वेळी आपण वापरतो त्यातली काही भांडी. - फ्रेश व्हायला जातो तेव्हा ब्रश ठेवायचं रॅक, बाथरूमधल्या टाइल्स, तेथे अडकवायच्या खुंटी, शेव्हिंग किट, आधुनिक प्रकारचे नळ कोठून आलेले असतात?- मेकअपसाठी वापरले जाणारे उत्पादनं, बूटांची पॉलिश.आॅफिसकडे जायला निघतो - तेव्हा कारमधील अ‍ॅक्सेसरीज, हातात घालतो ते घड्याळ, कारमधले स्पीकर, कीचेन, जीपीएस यंत्रणा असतात का ‘मेड इन इंडिया’?आॅफिसमध्ये आल्यानंतर- आॅफिसमधील स्टेशनरी, कम्पुटर/ लॅपटॉप, स्कॅनर्स, हेडसेट.- मीटिंगरूमध्ये वापरले जाणारे कॅमेरे, टेलिफोन, प्रोजेक्टर्स, हेडफोन, टॅबलेट्स, मोबाइल नेटवर्कसाठी वापरले जाणारे उपकरणे, कॅमेरे कुठे तयार होतात?घरी परतल्यानंतर- घरी स्वच्छतेसाठी वापरली जाणारी साधने, डस्टबिन, टायलेट पेपर्स.- व्यायामासाठी वापरले जाणारे उपकरणे.- घरी वापरली जाणारी इस्त्री, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किरकोळ दुरुस्तीसाठी वापरले जाणारी साधणे, व्हॅक्यूम क्लिनर.- लहान मुलांची खेळणी, बॉल, एलसीडी-एलईडी टीव्ही, टीव्हीचा रिमोट आणि सेट टॉप बॉक्स.- घरात लावलेले दिवे, फॅन, फर्निचर, घरात भिंतीवर लावलेले घड्याळ, डिजिटल फोटो फ्रेम यापैकी बरेच काही चीनमध्ये तयार झालेले असते ना?...आणि झोपताना!नाइट लॅम्प्स, रूप फ्रेशनर, हीटर किंवा एअर कंडिशनर अशा वस्तू कोठून येतात?