शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘पेलेट’बंदी घातल्यास अधिक मृत्यू

By admin | Updated: August 20, 2016 01:23 IST

काश्मीर खोऱ्यातील हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेलेट गनवर (छर्ऱ्यांची बंदूक) बंदी घालण्यात आली, तर बेकाबू परिस्थितीत जवानांना नाईलाजाने

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पेलेट गनवर (छर्ऱ्यांची बंदूक) बंदी घालण्यात आली, तर बेकाबू परिस्थितीत जवानांना नाईलाजाने गोळ्या चालवाव्या लागतील आणि त्यामुळे अधिक मृत्यू होतील, असे केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) शुक्रवारी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाला सांगितले. सीआरपीएफकडील उपलब्ध पर्यायांतून पेलेट गनचा पर्याय काढून घेण्यात आला, तर अशांत आणि दंगलीच्या परिस्थितीत आणि हिंसाचाराच्या काळात सीआरपीएफ जवानांना रायफलीतून गोळ्या चालवाव्या लागतील आणि त्यामुळे अधिक लोकांचा बळी जाण्याची भीती आहे, असे सीआरपीएफने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. न्यायालयात दाखल याचिकेवर सीआरपीएफने शपथपत्राच्या माध्यमातून म्हणणे मांडले. काश्मीर खोऱ्यात जमावावर नियंत्रणास पेलेट गनचा वापर करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)अचूक नेम लावणे अनेकदा शक्य होत नाहीहिंसाचारादरम्यान सशस्त्र दले आणि निदर्शक दोघेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलत असल्यामुळे स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळणे कठीण होते. टोकाच्या स्थितीत जमावाला आवर घालण्यासाठी शस्त्र वापरण्याची वेळ आलीच तर समोरच्यांच्या छातीखालील भागांवर मारा करावा, असे एसओपी सांगते; परंतु हिंसक निदर्शक, त्यांचे अस्थिर असणे यामुळे अचूक नेम लावणे अनेकदा शक्य होत नाही, असे सीआरपीएफने सांगितले.