शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांहून अधिक रोकड बाळगण्यास बंदी येणार?

By admin | Updated: January 20, 2015 02:31 IST

प्रवासात सोबत नेण्याच्या रकमेवर १० लाख रुपयांची कमाल मर्यादा घालण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रस्ताव असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात तशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशातील काळ्या पैशाला आवर घालण्याचा एक उपाय म्हणून कोणाही व्यक्तीने रोकड स्वरूपात जवळ बाळगण्याच्या किंवा प्रवासात सोबत नेण्याच्या रकमेवर १० लाख रुपयांची कमाल मर्यादा घालण्याचा प्राप्तिकर विभागाचा प्रस्ताव असून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात तशी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.प्राप्तिकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, मोठ्या रकमेच्या खरेदी व्यवहारांमध्ये खरेदीदार आणि विक्रेता या दोघांनीही आपापले ‘पॅन नंबर’ नमूद करणेही सक्तीचे केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार यासाठी एक लाख रुपयांची मर्यादा ठरविली जाऊ शकेल.सूत्रांनी असेही सांगितले की, जवळ बाळगायच्या रोकड रकमेवर अशी कमाल मर्यादा घातल्यानंतर त्याहून अधिक रोकड ज्याच्याकडे आढळून येईल त्याला जबर दंड आकारणी करण्याचाही प्रस्ताव असून हा दंड किती असावा याचे नियम तयार केले जात आहेत. सध्या कोणाही व्यक्तीने किती रोकड एका वेळी जवळ बाळगावी यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या खरेदी व्यवहारासाठी ‘पॅन नंबर’ सक्तीचा करावा, असाही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा प्रस्ताव आहे. खरेदीदाराकडे ‘पॅन’ नसेल तर ‘आधार’सह अन्य सरकारमान्य ओळख दस्तावेज देणे त्याला सक्तीचे असेल. विके्रत्यालाही ‘पॅन नंबर’ लागेल. ४गेल्या लोकसभा निवडणुकीत काळा पैसा हा कळीचा मुद्दा होता व काळ्या पैशाविरुद्ध खंबीर पावले उचलण्याच्या आश्वासनावर लोकांनी भाजपच्या हाती सत्ता दिली आहे. ४अर्थात त्या चर्चेचा मुख्य रोख भारतीयांनी परदेशात दडवून ठेवलेल्या काळ्या पैशाकडे होता.४तो काळा पैसा हुडकून देशात परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपासी पथकही (एसआयटी) नेमले आहे.४असे असले तरी देशातील काळा पैसा हाही तेवढाच डोकेदुखीचा विषय आहे व त्याला लगाम घालणेही गरजेचे आहे, यावर तज्ज्ञांचे एकमत दिसते.