शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महिना उलटला ‘अच्छे दिन’ कधी येणार ?

By admin | Updated: June 27, 2014 02:10 IST

महागाईवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलायचे झाल्यास हा एक महिन्याचा काळ अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो.

मोठे आव्हान : काळा पैसा परत आणणो, रेल्वे अपघात, महागाई रोखणो; मोदींनी आणली नवी कार्यसंस्कृती
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
कोणत्याही नव्या सरकारसाठी एक महिन्याचा काळ पुरेसा ठरत नाही मात्र ‘अच्छे दिन’ आणि महागाईवर नियंत्रण आणण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलायचे झाल्यास हा एक महिन्याचा काळ अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो.
26 मे रोजी सहका:यांसोबत मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेऊन महिना उलटला आहे. ‘अच्छे दिन’ मान्सूनच्या ढगांसारखे दूरवर कुठेही दिसत नाहीत. पण या एक महिन्यात मोदींनी नव्या कार्यसंस्कृतीची चुणूक दाखविली. ‘किमान शासन अधिक प्रशासना’वर भर देत संपुआ सरकारच्या काळातील सर्व मंत्रिगट, जीओएम, इजीओएम विसजिर्त करीत सर्व मंत्रलयांना आपापल्या खात्यांसंबंधी निर्णय स्वत:च घेण्याचा आदेश दिला. त्यांनी नोकरशहांना कामगिरी दाखवावी लागेल असेच बजावले आहे. त्याचा परिणाम दिसू लागला आहे. अधिकारी, बाबू(लिपिक) आता सकाळी लवकर कार्यालयात पोहोचतात. उशिरार्पयत काम करतानाचे चित्र बघायला मिळते. मंत्री आणि खासदारांचे खासगी सचिव आणि सहायकांच्या नियुक्तीत भाई-भतीजावाद बाजूला सारला. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणा:या मोदींनी प्रत्यक्षात काँग्रेसमुक्त शासनाची सुरुवात केली आहे. संपुआ सरकारच्या काळातील राज्यपालांवर राजीनाम्यासाठी दबाव आणला जात आहे. विविध आयोग आणि मंडळांवरील काँग्रेस नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. योजना आयोगाच्या भूमिकेवर मंथन सुरू आहे. संपुआ सरकारमधील सचिव, खासगी सचिवांना स्टाफमध्ये जागा राहणार नाही. त्याचा फटका खुद्द गृहमंत्री राजनाथसिंग यांना बसला. माजी विदेशमंत्री सलमान खुर्शीद यांचे खासगी सचिव राहिलेले आलोक सिंग यांची नियुक्ती करण्याच्या विचारात होते. अनेक मंत्र्यांनाही आपल्या आवडत्या अधिका:यांना सहायक बनविता येऊ शकले नाही.
मंत्र्यांची चुप्पी..
गुप्तचर विभागाच्या मदतीने अधिका:यांचे डोङिायर तयार आहे. सचिव स्तरावरील अधिका:यांना निर्णयात कोणतीही अडचण येणार नाही असा संदेश देण्यात आला आहे. अधिका:यांना थेट पंतप्रधानांना माहिती देण्याचे अधिकार देण्यात आल्याची बाब मंत्र्यांच्या पचनी पडलेली नाही. नगरविकास आणि संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू, कायदामंत्री रविशंकर प्रसाद, माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनाच सरकारकडून बोलण्याचा अधिकार आहे. केवळ कॅबिनेटमंत्र्यांनाच आपल्या मंत्रलयाविषयी माहिती देता येईल, असा आदेश असल्यामुळे एक अदृश्य भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
काही कडू, काही गोड; गॅस, रॉकेल दरवाढ तूर्त स्थगित
4नर्मदा नदीवरील सरदार सरोवराची उंची 17 मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विजेचा प्रश्न सोडविण्यात मदत होईल पण मध्य प्रदेश आणि गुजरातमधील आदिवासी भाग बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
4निवृत्त न्यायाधीश एम.बी.शाह यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना. काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन. भ्रष्टाचार निपटण्यासाठी पारदर्शकतेवर भर पण मोठी मजल गाठायची आहे.
4रेल्वेचे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान आहे. मोदी सरकारने शपथ घेतली त्याच दिवशी संत कबीरनगर येथे गोरखनाथ एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात 27 प्रवासी ठार झाले. नुकताच डिब्रुगड- दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला अपघात झाला आहे.
4रेल्वे भाडेवाढ आणि साखरेचे वाढलेले दर पाहता सरकारने गॅस, सीएनजी, पाईपद्वारे पुरविला जाणारा गॅस आणि रॉकेलची दरवाढ तूर्तास थांबविली आहे.
4परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेबांधणीला वेग देताना सीमा रस्ते संघटनेच्या(बीआरओ) कामावर नाराजी व्यक्त करीत या संघटनेकडून काम काढून घेतले आहे.
 
रेल्वेची भाडेवाढ
4मोदी सरकारने रेल्वे प्रवास आणि मालभाडय़ात अनुक्रमे 14.2 आणि 6.5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी कडू गोळीची गरज आहे, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे शिवसेनेने आणलेला दबाव पाहता सरकारला 8क् कि.मी.र्पयत द्वितीय श्रेणीचे प्रवासभाडे जुन्याच दराने कायम ठेवणो भाग पडले.