शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मे महिनाभर धो-धो कोसळला! पावसा, जूनमध्ये तरी उसंत घेशील का? IMD चा अंदाज आला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:54 IST

Monsoon June Forecast Update: यंदा मान्सूनने 'सुपरफास्ट लोकल' पकडली होती. यामुळे तो गंतव्य स्थानापर्यंत वेळेपूर्वीच पोहोचला आहे.

मे महिन्यात पावसाने कहर केला असून कधी नव्हे तो मे महिना उकाड्यापासून सुसह्य करणारा ठरला आहे. मान्सून त्याच्या नियमित वेळेपेक्षा जवळपास आठवडाभर लवकर आला आहे. सरासरीनुसार आता कुठे केरळच्या वेशीवर असणारा मान्सून या वर्षी पार मुंबई-पुण्यापर्यंत पोहोचला आहे. यामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांना पावसाचे हे वागणे नुकसानकारक ठरले आहे. अशातच आता जून महिन्याचा पावसाचा अंदाज आला आहे. 

यंदा मान्सूनने 'सुपरफास्ट लोकल' पकडली होती. यामुळे तो गंतव्य स्थानापर्यंत वेळेपूर्वीच पोहोचला आहे. आज थोडी पावसाने उसंत घेतली आहे. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून उन देखील लागत आहे. यामुळे पाऊस आता उसंत घेणार असे वाटत असताना भारतीय हवामान खात्याचे जून महिन्याचे अंदाज आले आहेत. 

जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १०८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  जूनमध्ये सरासरी १६६.९ मिमी पाऊस होतो, यंदा त्यापेक्षा जास्त होणार आहे. म्हणजेच उसंत मिळणार नाही, उनही फार जास्त काळ मिळणार नाही. असे असले तरी भारताच्या दक्षिणेकडील भागांमध्ये, वायव्य आणि ईशान्येकडील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी म्हटले आहे. 

मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा या मुख्य मान्सून क्षेत्रांभोवती सामान्यपेक्षा जास्त १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. हिमाचल प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे वायव्य भारत आणि मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेचे दिवस कमी होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये जूनच्या मध्यापर्यंत मान्सून पोहोचू शकतो. 

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसRainपाऊसweatherहवामान अंदाजMonsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजMonsoon Specialमानसून स्पेशलMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट